IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर खेळविण्यात येणार आहे.

IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?
Mumbai Indians Vs Royal Challengers Banglore
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 2:35 PM

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL-14) चौदाव्या मोसमाचं बिगुल आज वाजणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Banglore) यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर (MA Chidambram Stadium Chennai) खेळविण्यात येणार आहे. लागोपाठ दोन वेळा मुंबईने आयपीएलचा करंडक आपल्या नावे केलाय. आता सलामीच्या लढतीत विजयी सलामी देऊन स्पर्धेची सुरुवात थाटात करण्यास रोहितची ब्लू आर्मी सज्ज आहे. तर दुसरीकडे आक्रमक खेळाडू्ंनी भरलेला बंगळुरु संघ मुंबईला नमवून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून द्यायला तयार आहे.  (IPL 2021 mumbai Indians Vs Royal Challengers Banglore Live Streaming when & where to watch online Free in Marati 08 April 2021)

कशी आहे रोहितची ब्ल्यू आर्मी?

मुंबईच्या संघात अनुभवी आणि विस्फोटक खेळाडूंचा भरणा आहे. तसंच संघातील सगळे खेळा़डू एकाचढ एक फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजांना रोखायचं कसं, असा प्रश्न बंगळुरु संघाला नक्की पडला असेल. मुंबईचे सलामीवार कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघांना फोडून काढण्यास नेहमीच सज्ज असतात. तसंच सलामीचा फलंदाज म्हणून मुंबईकडे क्रिस लिनचा देखील पर्याय असणार आहे. तसंत सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला रोखायचं मोठं आव्हान बंगळुरुसमोर असणार आहे. तसंच पांड्या ब्रदर्स देखील ऐन फॉर्मात आहेत. पोलार्डची बॅट देखील बोलतीय. एकूणच मुंबईची बॅटिंग लाईनअप तगडी आहे.

दुसरीकडे बोलिंगबाबतही मुंबईचा संघ आघाडीवर आहे. यॉर्ककर किंग जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट यांच्यासारखे दोन जागतिक दर्जाचे बोलर मुंबईजवळ आहेत जे कोणत्याही क्षणी मॅच पलटवू शकतात तसंच कुल्टर नाईलचा देखील मुंबईच्या संघात समावेश आहे. अनुभवी पीयुष चावला आणि राहुल चाहरच्या फिरकीने मुंबईच्या बोलिंगला एक वेगळीच धार चढली आहे.

विराटची रॉयल रेड आर्मी कशी आहे?

प्रत्येक आयपीएलच्या हंगामात जशी बंगळुरुची टीम खतरनाक वाटते तशीच यंदाच्या हंगामात देखील बंगळुरुची टीम विस्फोटक वाटतीय. देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहलीच्या रुपाने बंगळुरुकडे आक्रमक सलामी जोडी आहे जी जो़डी जगातल्या क्लास बोलर्सचा समाचार घेण्यास सज्ज आहे. संघात ए बी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे हिटर आहेत जे जगातल्या कोणत्याही बोलर्सचे बॉल स्टेडियमच्या बाहेर पाठवण्यास सक्षम आहेत. त्यांचा दिवस असला की ते प्रतिस्पर्धी संघाच्या चिंधड्या उडवल्याशिवाय राहत नाही. न्यूझीलंडच्या फीन एलेनचा देखील संघात समावेश करण्यात आलेला आहे.

रजत पाटीदार, मोहम्मद, काइल जमैसिन आणि क्रिस्टियनच्या रुपाने चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा बंगळुरु संघात आहे. बोलिंगमध्ये केन रिचर्डसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, अॅडम झॅम्पा यांसारखे टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट बोलर्स बंगळुरुच्या संघात आहेत.

सामना कधी आणि कुठे…?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना आज 9 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या बवेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 mumbai Indians Vs Royal Challengers Banglore Live Streaming when & where to watch online Free in Marati 08 April 2021)

हे ही वाचा :

पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने का खरेदी केलं? रोहित शर्माने सांगितली ‘राज की बात’!

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून घरी परतला

‘मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन’, गावस्कर यांच्यानंतर या दिग्गजाची भविष्यवाणी!

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.