Ravindra Jadeja | आधी रॉकेट थ्रो करत रन आऊट, त्यानंतर हवेत झेपावत शानदार कॅच, रवींद्र जाडेजाची शानदार फिल्डिंग, पाहा व्हिडीओ
रवींद्र जाडेजाने (ravindra jadeja) रॉकेट थ्रो करत के एल राहुलला (k l rahul) रन आऊट केलं. त्यानंतर हवेत झेपावत ख्रिस गेलचा (chris gayle) सुंदर कॅच घेतला.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 8 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings ) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून पंजाबला फलंदाजीसाठी भाग पाडले आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधार धोनीचा (Mahendra Singh Dhoni) हा निर्णय योग्य ठरवला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) पावर प्लेमध्ये 3 विकेट्स घेतल्या. दरम्यान रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) पंजाबचा कर्णधार के एल राहुलला रॉकेट थ्रो करत रन आऊट केलं. तर त्यानंतर युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा हवेत झेपावत शानदार कॅच घेतला. (ipl 2021 pbks vs csk ravindra jadeja run out k l rahul and take a superb catch by chris gayle)
जाडेजाचा रॉकेट थ्रो
दीपक चहर सामन्यातील तिसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर ख्रिस गेलने जाडेजाच्या दिशेने फटका मारला. यावेळेस गेलने एकेरी धावेसाठी केएलला कॉल दिला. मात्र चलाख जाडेजाने डायरेक्ट थ्रो करत के एलला रन आऊट केलं. राहुलने 5 धावा केला. के एलच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला.
"Ravindra Jadeja is the Best fielder in the World. You cannot take a runs against Ravi Jadeja as fielder." – Gautam Gambhir#jadeja #CSKvPBKS @imjadeja | @GautamGambhir Bapu Rocks! pic.twitter.com/7kXIBC8HmO
— Akshayrajsinh Mahendrasinh Sarvaiya (@AkshayrajsinhS) April 16, 2021
गेलचा शानदार कॅच
त्यानंतर दिपक चाहर सामन्यातील पाचवी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर गेलने गेलने फटका मारण्याचा प्रयत्न केला. गेलने मारलेला फटका जाडेजापासून जरा दूर होता. मात्र जाडेजाने चेंडूवर लक्ष ठेवत धावत जात हवेत झेपावत अफलातून कॅच घेतला.
You can never write-off #Jaddu ??#IPL2021 #IPL #csk #CSKvPBKS #jadeja pic.twitter.com/C0khuDTp93
— Vignesh (@worldofvignesh) April 16, 2021
पंजाबच्या पावर प्लेमध्ये 26 धावा
पंजाबने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 26 धावा केल्या आहेत. या दरम्यान पंजाबने महत्वपूर्ण 4 विकेट्स गमावल्या.
संबंधित बातम्या :
Punjab Kings vs Chennai Super Kings Live Score, IPL 2021 | पंजाबला सहावा धक्का, झाये रिचर्डसन आऊट
IPL 2021 | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने, ‘या’ 4 खेळाडूंना विक्रम करण्याची संधी
(ipl 2021 pbks vs csk ravindra jadeja run out k l rahul and take a superb catch by chris gayle)