IPL 2021 : 41 वर्षीय गेलचा आयपीएलमध्ये मोठा रेकॉर्ड, आजपर्यंत कोणत्याही बॅट्समनला असा कारनामा जमला नाही!

ख्रिस गेलने आक्रमक सुरुवात करत महत्त्वपूर्ण 40 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने उत्तुंग 2 षटकार लगावले. त्याचसोबत त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. chris gayle Became First Batsman In IPL Hit 350 Six

IPL 2021 : 41 वर्षीय गेलचा आयपीएलमध्ये मोठा रेकॉर्ड, आजपर्यंत कोणत्याही बॅट्समनला असा कारनामा जमला नाही!
ख्रिस गेलचे आयपीएलमधील 350 षटकार पूर्ण
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 7:13 AM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना मंगळवारी रात्री राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळवण्यात आलेल्या थरारक सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर 221 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने झंझावती शतक झळकावत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. परंतु शेवटच्या चेंडूवर संजूला षटकार ठोकता आला नाही, त्यामुळे हा सामना राजस्थानने गमावला. या सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलने आक्रमक सुरुवात करत महत्त्वपूर्ण 40 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने उत्तुंग 2 षटकार लगावले. त्याचसोबत त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. (IPL 2021 PBKS vs RR chris gayle Became First Batsman In IPL Hit 350 Six)

गेलचे आयपीएल कारकीर्दीत 350 षटकार पूर्ण

राजस्थानने टॉस जिंकून प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. केएल राहुल आणि मयंक अग्रवालने डावाची सुरुवात केली. मयांकने 2 उत्कृष्ट चौकार मारले. पण राजस्थानकडून डेब्यू करत असलेल्या चेतन सकारियाने त्याला विकेट कीपर संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडलं. मयांकच्या बाद होण्यानंतर मैदानात पाऊल ठेवलं ते युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने. तो सुरुवातीपासून लयीत दिसत होता. त्याने स्ट्रेट आणि लेग साईडला दोन उत्तुंग षटकार मारले. याचसोबत त्याने आयपीएल इतिहासातील 350 षटकार पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात गेलपेक्षा कुठल्याही खेळाडूकडे जास्त षटकार मारलेले नाहीत.

कुणाच्या नावावर किती षटकार?

आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स 237 षटकारांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून त्याच्या नावावर 216 षटकार आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गेल आपल्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता पण परागच्या चेंडूवर बेन स्टोक्सने त्याचा झेल टिपला आणि ख्रिस गेलची आक्रमक इनिंग संपुष्टात आली.

गेलच्या नावावर सर्वाधिक शतके

ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक शतकं देखील आहेत. गेलच्या नावावर एकूण 6 शतके आहेत. दुसर्‍या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली असून त्याच्या नावावर 5 शतके आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याच्या नावावर 4 शतके आहेत.

पंजाबच्या फलंदाजांनी राजस्थानच्या बोलर्सला तुडवलं

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबच्या संघाने राजस्थानसमोर 222 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने 91 धावांची शानदार खेळी खेळली. तर युवा खेळाडू दीपक हुडाने 28 चेंडूमध्ये 64 धावांची आक्रमक खेळी केली. ख्रिस गेलने 40 धावा केल्या. राजस्थानच्या सर्व गोलंदाजांनी धावांची खिरापत वाटली. पंजाबने राजस्थानविरुद्ध एकूण 13 षटकार ठोकले. प्रथमच कॅप्टन्सी करत असलेल्या संजू सॅमसनपुढे पंजाबच्या फलंदाजांना रोखण्याचं मोठं आव्हान होतं. पण पंजाबचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांवर वरचढ ठरले. संजूने एकूण 8 गोलंदाज वापरले पण तरीही पंजाबच्या फलंदाजांनी त्यांना फोडून काढलं. यामध्ये राजस्थाकडून डेब्यू करत असलेला चेतन सारकिया काही प्रमाणात वाचला.

(IPL 2021 PBKS vs RR chris gayle Became First Batsman In IPL Hit 350 Six)

हे ही वाचा :

RR vs PBKS : वडिल टेंपोचालक, क्रिकेट खेळण्यासाठी बूट नव्हते, तीन महिन्यांपू्वी भावाची आत्महत्या, IPL पदार्पणाच्या सामन्यात भल्याभल्यांना नाचवलं

RR vs PBKS Match Result : संजू सॅमसनचं झंझावाती शतक, शेवटच्या बॉलवर सिक्स मारण्यात अपयश, राजस्थान जिंकता जिंकता हरला!

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.