IPL 2021 : ‘संजू…. तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’, मॉरिसच्या प्रश्नावर सॅमसनचं खास उत्तर

मैदानावरच्या एका प्रसंगाने करोडो क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडावा अशी एक घटना घडली. ती घटना होती संजू सॅमसन आणि ख्रिस मॉरिस यांच्यातली, ज्या घटनेची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आहे. | Sanju Samson Chris Morris over last Ball of Match

IPL 2021 : 'संजू.... तुझा माझ्यावर भरोसा नाय का?', मॉरिसच्या प्रश्नावर सॅमसनचं खास उत्तर
संजू सॅमसन आणि ख्रिस मॉरिस
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 11:41 AM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) चौथा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (MA Chidambaram) खेळविण्यात आला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs Punjab Kings) यांच्यात अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला. शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. आणि क्रीजवर होते बोलर्सची यथेच्छ धुलाई केलेला संजू सॅमसन आणि आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस…. अशा परिस्थितीत देखील पंजाबच्या अर्शदीपने उत्तम गोलंदाजी करुन राजस्थानला सामना जिंकू दिला नाही. या सगळ्यात मैदानावरच्या एका प्रसंगाने करोडो क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडावा अशी एक घटना घडली. ती घटना होती संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ख्रिस मॉरिस (Chris Morris) यांच्यातली, ज्या घटनेची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आहे. (IPL 2021 PBKS vs RR Sanju Samson Chris Morris over last Ball of Match)

संजू सॅमसन आणि ख्रिस मॉरिस यांच्यातला प्रसंग काय…?

शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाब संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज होती. के एल राहुलने बॉल अर्शदीप सिंगच्या हाती दिला. स्ट्राईकला होता संजू सॅमसन… अर्शदीपने पहिलाच बॉल अतिशय उत्तम टाकला. ज्याच्यावर कोणताही रन्स निघाला नाही. अर्शदीपच्या दुसऱ्या चेंडूवर सॅमसनने एक रन घेतला. तिसऱ्याही चेंडूवर म़ॉरिसने  एक धाव घेऊन स्टाईक पुन्हा संजूला दिली. साहजिक दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर फलंदाजाला आक्रमक फटका मारण्याची संधी अर्शदीपने दिली नाही.

अर्शदीपच्या चौथ्या बॉलवर संजू सॅमसनने उत्तुंग षटकार खेचला. पाचवा बॉल सॅमसनने सीमारेषेबाहेर धाडायचा प्लॅन आखला परंतु सीमारेषेवर असलेल्या फिल्डरने तो बॉल अडवला. यावेळी एक धाव सहज निघाली असती परंतु आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या संजूने धाव न घेण्याचा निर्णय घेतला, त्याने ख्रिस मॉरिसला अर्ध्या पीचमधून परत पाठवलं आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावा लागत असताना मी षटकार ठोकून मॅच जिंकवू शकतो, या आत्मविश्वासाने त्याने सहावा चेंडू खेळला. 1 बॉल 5 रन्सची गरज असताना त्याने उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ दीपका हुडाकडे कॅच दिला.

संजूचा मॉरिसवर विश्वास नाही?

तत्पूर्वी पाचव्या बॉलवर एक रन्स निघत होता. तरीही संजूने रन्स न घेता ख्रिस मॉरिसला अर्ध्या पीचमधून परत पाठवलं. संजूच्या याच निर्णयाची आता चर्चा होते आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा म्हणजे 16.50 कोटी रुपये बोली लागलेला खेळाडू असलेल्या ख्रिस मॉरिसवर संजूचा विश्वास नाही का? असा सवाल मॅछ पाहणाऱ्या प्रत्येका्च्या मनात आला.

संजू सॅमसनचं खास उत्तर

मॅच संपल्यानंतर संजूला ज्यावेळी मॉरिसबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी त्याने त्या प्रसंगावर आपलं मत व्यक्त केलं. “माझ्या भावनांचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राजस्थानला जिंकून देण्याचं माझं ध्येय होतं. मला वाटतं की या खेळीपेक्षा मी अधिक काय करु शकलो असतो…?  मला वाटलं की मी शेवटच्या चेंडूवर षटकार मारेल. मी मोठ्या ताकदीने तो बॉल मारलाही पण तो सीमारेषेबाहेर न जाता उंच उडाला आणि दीपक हुडाने त्याचं काम केलं. शेवटी हा सगळा खेळाचा भाग आहे.”, असं संजू म्हणाला..

(IPL 2021 PBKS vs RR Sanju Samson Chris Morris over last Ball of Match)

हे ही वाचा :

IPL 2021 : 19 बॉलमध्ये 90 धावा ठोकल्या, तरीही मॅच गेली, सामन्यानंतर सॅमसन म्हणाला, ‘यापेक्षा मी अधिक काय करु शकत होतो…?’

IPL 2021 : शेवटच्या ओव्हर्सचा थरार, 6 बॉल 13 धावांची गरज, संजू-ख्रिस मैदानावर, पण या 22 वर्षीय बोलरने चाहत्यांची मनं जिंकली!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.