IPL 2021 | पंजाबकडून हा स्फोटक फलंदाज खेळण्यासाठी सज्ज, मुंबई विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणार?

पंजाब किंग्सचा (punjab kings) हा फलंदाज आयसीसीच्या टी 20 क्रमवारीत (dawid malan) पहिल्या क्रमांकावर आहे.

IPL 2021 | पंजाबकडून हा स्फोटक फलंदाज खेळण्यासाठी सज्ज, मुंबई विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणार?
पंजाब किंग्सचा (punjab kings) हा फलंदाज आयसीसीच्या टी 20 क्रमवारीत (dawid malan) पहिल्या क्रमांकावर आहे.
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 6:07 PM

चेन्नई | आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामातील 17 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chindambaram Stadium) खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी मागील सामना गमावला आहे. मुंबईने या हंगामातील 4 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला. तर 2 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्या बाजूला पंजाबला 4 पैकी सलग 3 सामन्यात पराभव झाला. या पराभवामुळे पंजाब जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पंजाबकडून आक्रमक फंलदाज पदार्पण करण्याची शक्यता आहे. (ipl 2021 punjab kings batsman dawid malan is likely to make his debut against mumbai indians)

कोण आहे हा खेळाडू?

डेव्हीड मलान (Dawid Malan) असं या खेळाडूचं नाव. मलान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व करतो. तर मलान हा आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मलान आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळतो. पंजाबने 1 कोटी 50 लाख मोजून मलानला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र मलानला अजूनही खेळायची संधी मिळाली नाही. मलान आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे मुंबई विरुद्धच्या सामन्यात मलानला संधी मिळाली तर त्याचे हे आयपीएल पदार्पण ठरेल.

डेव्हीड मलानला कोणाच्या जागी संधी?

डेव्हिड मलानला टीममध्ये निकोलस पूरनच्या जागी संधी मिळू शकते. निकोलस सलग 4 सामन्यात अपयशी ठरला आहे. विशेष म्हणजे 4 पैकी 3 सामन्यात शून्यावर बाद झाल आहे. तसेच फक्त एका सामन्यात 9 धावा केल्या आहेत. यामुळे पूरनला डच्चू देत मलानला संधी मिळू शकते.

मलानची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

मलानने एकूण 24 टी सामन्यात 50.15 च्या सरासरीने आणि 144.32 स्ट्राईक रेटने 1 हजार 3 धावा केल्या आहेत. यामध्ये मलानने 1 शतक आणि 10 अर्धशतकं लगावले आहेत. 103 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच मलानने 3 एकदिवसीय आणि 15 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.

पंजाबचा चांगल्या सुरुवातीनंतर सलग पराभव

पंजाबने या मोसमाची विजयाने सुरुवात केली. त्यानंतर मात्र पंजाबची रेल्वे रुळावरुन घसरली. पंजाबला सलग 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पंजाबचे फलंदाज सातत्याने निराशाजनक कामगिरी करतायेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून जोरदार कमबॅक करण्याचा मानस पंजाबचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात पंजाब विजय मिळवणार की मुंबई वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

PBKS vs MI, IPL 2021 Match Prediction | पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

IPL 2021 PBKS vs MI Head to Head | पंजाबचे किंग्स की मुंबईची पलटण, कोण मारणार बाजी, आकडेवारी कोणाच्या बाजूने?

(ipl 2021 punjab kings batsman dawid malan is likely to make his debut against mumbai indians)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.