IPL 2021 : क्वारंन्टाईनचा खेळ संपला, पंजाबचा ‘वाघ’ बाहेर आला, प्रतिस्पर्ध्यांना धडकी!
पंजाब किंग्जचा (Punjab Kings) आक्रमक खेळाडू द युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने (Chris Gayle) आपला क्वारन्टाईन काळ पूर्ण करत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा श्रीगणेशा (IPL 2021) उद्या म्हणजेच 9 एप्रिलला होणार आहे. सलामीची लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात पार पडणार आहे. सगळ्या संघांची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आहे. अशातच पंजाब किंग्जचा (Punjab Kings) आक्रमक खेळाडू द युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने (Chris Gayle) आपला क्वारन्टाईन काळ पूर्ण करत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. पंजाबने गेलचा एक खास व्हिडीओ ट्विट करत विरोधी संघांची धडधड वाढवली आहे. (IPL 2021 Punjab Kings Chris Gayle Completed his Quarantine period)
‘तुमचा फेव्हरेट ख्रिस गेल बाहेर आलाय…’
ख्रिस गेल आयपीएलमध्ये धुमधडाका करण्यासाठी सज्ज आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या गेलचा काल (7 एप्रिल) रोजी क्वारन्टाईन पिरीयड पूर्ण झाला. पंजाब किंग्जने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. क्वारन्टाईनचा खेळ संपला. तुमचा फेव्हरेट ख्रिस गेल बाहेर आलाय… असं म्हणत पंजाबने प्रतिस्पर्धी संघांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
Quarantine da khatam khel, bahar aa gaye tuhadde favourite – Chris Gayle ??#IPL2021 #SaddaPunjab #PunjabKings @henrygayle pic.twitter.com/rrDHPZ3lvQ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 7, 2021
गेलचा अफलातून डान्स
पंजाबचे सामने सुरु होण्यापूर्वी ख्रिस गेलने आपला क्वारन्टाईन पिरीयड पूर्ण केल्याने त्याने हा आनंद नाचून पूर्ण केला. ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये मायकल जॅक्सनच्या स्मूद क्रिमिनिल या प्रसिद्ध गाण्यावर गेल ‘मून वॉक डान्स’ करताना दिसून येत आहे.
पाठीमागच्या तीन हंगामात गेलची कामगिरी
ख्रिस गेल आयपीएल 2018 पासून पंजाब किंग्ज संघात खेळतो आहे. 2018 आणि 2019 मध्ये त्याने केएल राहुलबरोबर सलामीची येऊन बॅटिंग केली. सध्या तो तिसर्या क्रमांकावर खेळतो. 2018 मध्ये त्याने 11 सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 368 धावा केल्या. त्यानंतर आयपीएल 2019 मध्ये चार अर्धशतकांच्या मदतीने त्याने 490 धावा केल्या. या दरम्यान, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 99 अशी होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आयपीएलच्या 13 व्या सत्रात स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने केवळ 7 सामने खेळले. आजारी असल्याने तो सुरुवातीच्या सामन्यात संघाचा भाग होऊ शकला नाही.
टी ट्वेन्टीमधील गेलची कामगिरी
ख्रिस गेलने आतापर्यंत 132 टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. या सामन्यांत 41.13 च्या सरासरीने 4772 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सहा शतके आणि 31 अर्धशतके आहेत. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 349 गगनचुंबी षटकार खचले आहेत. म्हणजेच त्याने केवळ 349 चेंडूंत 2094 धावा केल्या. तसंच 384 चौकार मारुन केवळ चौकारांच्या साहाय्याने 1536 धावा ठोकल्या आहेत.
हे ही वाचा :
IPL 2021 : कोरोनावर मात करुन RCB चा महत्त्वाचा शिलेदार संघात परतला
VIDEO | हात पकडून अनुष्काने विराटला उचललं, कोहलीच्या तोंडून पटकन निघालं…
Moeen Ali | मोईन अली क्रिकेटर नसता, तर ISIS मध्ये असता, तस्लिमा नसरीन यांचं ट्वीट डीलीट, वाद कायम