IPL 2021 : रिषभ पंतला आऊट केल्यावर खेळाडू मैदानातच नाचला, Video व्हायरल

रिषभ पंत (Rishabh Pant) रनआऊट झाला तेव्हा राजस्थानच्या रियान परागने (Riyan Parag) मैदानातच डान्स करायला सुरुवात केली. (Riyan Parag Dance After Rishabh Pant RunOut)

IPL 2021 : रिषभ पंतला आऊट केल्यावर खेळाडू मैदानातच नाचला, Video व्हायरल
रिषभ पंत (Rishabh Pant) रनआऊट झाला तेव्हा राजस्थानच्या रियान परागने (Riyan Parag) मैदानातच डान्स करायला सुरुवात केली.
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 7:25 AM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) सातव्या सामन्यात राजस्थानने दिल्लीला (Rajasthan Royals vs Delhi Capital) 3 विकेट्सने हरवलं. या रोमांचक सामन्यात धोकादायक ठरत असलेला दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) रनआऊट झाला तेव्हा राजस्थानच्या रियान परागने (Riyan Parag) मैदानातच डान्स करायला सुरुवात केली. त्याला रिषभच्या आऊट होण्याच्या एवढा अत्यानंद झाला की त्याने उपस्थित सहकाऱ्यांच्या साथीने ठुमके लगावले. सहकारीही त्याच्या आनंदात सामील झाले. (IPL 2021 Rajasthan Royals vs Delhi Capital Riyan parag Dance After Rishabh Pant RunOut)

टॉस जिंकून राजस्थानने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची अतिशय खराब सुरुवात झाली. पहिल्याच पॉवरप्ले मध्ये दिल्लीने टॉप ऑर्डर्सच्या 3 विकेट्स गमावल्या. दिल्लीच्या टिच्चून माऱ्यासमोर कर्णधार रिषभ पंतचं अर्धशतक वगळता दुसरा कोणताही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. दिल्लीच्या डावादरम्यान 51 धावांवर खेळत असलेल्या रिषभला रियान परागच्या अप्रतिम थ्रोमुळे तंबूत जावं लागलं. यावेळी रियान परागने मैदानातच ‘बिहु’ डान्स केला. याअगोदरही त्याने मैदानावर आनंद व्यक्त करण्यासाठी ‘बिहु’ डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ :

राजस्थानचा दिल्लीवर रॉयल विजय

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अटीतटीच्या झालेल्या लढतीत ख्रिस मॉरिसच्या झंझावाती खेळीने राजस्थानला सुंदर विजय मिळाला आणि दिल्लीला 3 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. सुरुवातीलाच राजस्थानच्या 5 विकेट्स घेऊन दिल्लीने सामना अर्धा खिशात घातला होता मात्र डेव्हिड मिरलचं झुंझार अर्धशतक आणि मॉरिसने खेळलेल्या आक्रमक खेळीने दिल्लीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

मिलरने रचला विजयाचा पाया, मॉरिस झालासी कळस

दिल्लीने राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरदाखल बॅटिंगसाठी उतरलेल्या राजस्थानच्या संघांची सुरुवात देखी अतिषय खराब झाली. राजस्थानच्या पहल्या 5 विकेट्स तर केवळ 42 रन्सवर पडल्या होत्या. मग डावाची सूत्रे डेव्हिड मिलरने हाती घेतली. बॅट्समन आऊट झालेले असताना त्याने त्याचा अजिबातही विचार न करता आक्रमक फटके सुरुच ठेवले. यादरम्यान त्याने खणखणीत अर्धशतक झळकावलं.

धावगती वाढवण्याच्या नादात मिलर कॅचआऊट झाला. आता सगळी जबाबदारी ख्रिस मॉरिसवर आली होती. त्याने थंड डोक्याने खेळ केला. बोलिंगमध्ये कमाल केलेला जयदेव उनाडकट मॉरिसच्या साथीला होता. या दोघांना मिळून राजस्थानच्या विजयाची नौका पार करायची होती. त्यांनी त्याचं काम उत्तम केलं. राजस्थानने 16 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या तसंच आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसने कमाल केली. त्याने केवळ 18 चेंडूत बेधडक 36 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने एकही चौकार न मारत गगनचुंबी 4 षटकार मारले.

ख्रिस मॉरिसने संजूला विचार करायला भाग पाडलं…!

राजस्थानच्या विजयाची नौका ख्रिस मॉरीसने बहादुरपणे पार करुन दाखवली आणि डगआऊटमध्ये बसलेल्या संजू सॅमसनला विचार करायला भाग पाडलं की “पंजाबविरुद्धच्या सामन्यात मला स्ट्राईक द्यायला हवी होती…”

हे ही वाचा :

IPL 2021: पहिल्या मॅचमध्ये संजूने दिली नाही स्ट्राईक, दुसऱ्या मॅचमध्ये चमकला ख्रिस मॉरिस!

RR vs DC, IPL 2021 Match 7 Result | ख्रिस मॉरीसचा ‘हल्ला बोल’, रंगतदार सामन्यात राजस्थानची दिल्लीवर 3 विकेट्सने मात

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.