IPL 2O21 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी RCBला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूची माघार

आयपीएलच्या 14 व्या मोसमाची (ipl 2021) सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या जोश फिलीपीने (Josh Philippe) माघार घेतल्याने फिन एलनला (Finn Allen) संधी देण्यात आली आहे.

IPL 2O21 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी RCBला मोठा धक्का, 'या' स्टार खेळाडूची माघार
आयपीएलच्या 14 व्या मोसमाची (ipl 2021) सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या जोश फिलीपीने (Josh Philippe) माघार घेतल्याने फिन एलनला (Finn Allen) संधी देण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 10:41 AM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) आता मोजून काही दिवस शिल्लक आहेत. क्रिकेट टीमसह चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. पण त्याआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये (Royal Challengers Bangalore) मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जोश फिलीपीने (Josh Philippe) या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बंगळुरुला मोठा धक्का लागला आहे. मात्र जोशच्या जागी संघात न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज फिन एलनला (Finn Allen) ताफ्यात घेतलं आहे. फिनला 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून कोणीही खरेदी केलं नव्हतं. त्याची बेस प्राईज 20 लाख इतकी होती. मात्र आता फिलिपीने माघार घेतल्याने फिनला खेळण्याची संधी मिळाली आहे. (ipl 2021 rcb Opportunity for Finn Allen to replace Josh Philippe)

आरसीबीने काय म्हटलं?

जोश फिलीपीने माघार घेतल्यानं बंगळुरुने ट्विट केलं आहे. फिलीपीने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या जागी एलनला संधी दिली आहे. जोश फिलीपीने 13 व्या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याने 5 सामन्यात 78 धावा केल्या होत्या. तर फिन एलनने न्यूझीलंडसाठी 12 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 अर्धशतक लगावले आहेत. नुकतंच न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश टी 20 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.

सुपर स्मॅश टी 20 स्पर्धेतील कामगिरी

सुपर स्मॅश टी 20 स्पर्धेत एलनने वेलिंग्टनचे प्रतिनिधित्व केलं होतं. यामध्ये त्याने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने 512 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 अर्धशतक लगावले होते. नाबाद 92 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचा स्ट्राईक रेट हा 193 इतका होता. तसेच एलनने एकूण 56 चौकार आणि 25 उत्तुंग षटकार खेचले होते. एलन या स्पर्धेत, सर्वाधिक धावा, चौकार, षटकार आणि अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला होता. दरम्यान एलन या आयपीएलच्या 14 व्या मोसमात कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

अशी आहे बंगळुरु टीम : विराट कोहली (कर्णधार), मोहम्‍मद सिराज, जोश फिलिप, एबी डिव्हीलियर्स, डॅनियल सॅम्‍स, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, देवदत्‍त पडिक्‍कल, पवन देशपांडे, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, अॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन, कायले जॅमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टियन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, केएस भरत आणि सुयश प्रभुदेसाई.

संबंधित बातम्या :

IPL Royal Challengers Bangalore Team 2021 | विराट-मॅक्सवेलसह अनेक स्फोटक फलंदाज, बंगळुरुची असणार विजेतेपदावर नजर, बघा सर्व खेळाडूंची नावं

IPL 2021 Mumbai Indians Schedule | मुंबईकर ‘पलटण’ पहिल्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध भिडणार, जाणून घ्या मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक

(ipl 2021 rcb Opportunity for Finn Allen to replace Josh Philippe)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.