IPL 2021 : हर्षल पटेलची हॅट्रिक हुकली पण मुंबईविरुद्ध कुणालाही जमली नाही अशी कामगिरी करुन दाखवली!

जगातील कोणत्याही बोलर्सला मुंबईविरुद्ध अशी कामगिरी करता आली नाही ती कामगिरी हर्षल पटेलने केली आणि ज्यावेळी बॅटिंगने आपला क्लास दाखवण्याची वेळ आली तेव्हा विनिंग रन्सदेखील त्याने त्याच्याच बॅटने घेतला. (IPL 2021 RCB vs MI Harshal Patel Miss Hat Trick 5 Wicket Against Mumbai Indians)

IPL 2021 : हर्षल पटेलची हॅट्रिक हुकली पण मुंबईविरुद्ध कुणालाही जमली नाही अशी कामगिरी करुन दाखवली!
Harshal Patel
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 6:41 AM

चेन्नई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरु (Mumbai indians vs Royal Challengers Banglore )… खेळाडू आणि क्रिकेट रसिक प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला…. बंगळुरुचा टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय… मुंबईच्या ताफ्यात आयपीएलमधले सगळ्यात बिग हिटर.. पण या बिग हिटरला पाणी पाजलं त्या एकट्या बंगळुरुच्या हर्षल पटेलने (Harshal Patel)… प्रथमत: जगातील कोणत्याही बोलर्सला मुंबईविरुद्ध अशी कामगिरी करता आली नाही ती कामगिरी हर्षल पटेलने केली आणि ज्यावेळी बॅटिंगने आपला क्लास दाखवण्याची वेळ आली तेव्हा विनिंग रन्सदेखील त्याने त्याच्याच बॅटने घेतला. त्याला मुंबईविरुद्ध हॅट्रिकचा चान्स होता… त्याची हॅट्रिक हुकली पण त्याने मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा गोलंदाज म्हणून जगातील पहिलाच खेळाडू होण्याचा मान मिळवला. (IPL 2021 RCB vs MI Harshal Patel Miss Hat Trick 5 Wicket Against Mumbai Indians)

हर्षलची हॅट्रिक हुकली..!

हर्षल पटेलने मुंबईच्या डावाच्या 20 व्या ओव्हरमध्ये तसंच आपल्या स्वत:च्या अखेरच्या म्हणजेच 4 ओव्हरमध्ये कमाल केली. त्याने 6 बॉलवर मुंबईच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. ओव्हर्सच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने मुंबईच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडलं.

हर्षल पटेलची जादू

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची प्रत्येक इच्छा आज हर्ष पटेलने पूर्ण केली, असं म्हणायला हरकत नाही. विराटने टाकलेला विश्वास आज हर्षलने सार्थ करुन दाखवला. आपल्या 4 ओव्हर्समध्ये त्याने 6.75 च्या सरासरीने 37 रन्स देऊन महत्त्वाच्या 5 विकेट्स घेतल्या. त्यातही मुंबईच्या सगळ्यात घातक समजल्या जाणाऱ्या इशान किशन, हार्दिक पांड्या, पोलार्ड, क्रुणाल पांड्या आणि मार्को जेनसन या पाच फलंदाजांना त्याने तंबूत पाठवलं.

कुणालाही जमली नाही अशी क्रांती हर्षलने करुन दाखवली

आजच्या सामन्यात मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा हर्षल पटेल जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांच्या आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने आज 4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे मुंबईविरोधात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड याआधी रोहित शर्माच्या नावावर होता. होय! सध्याचा मुंबईचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने हैदराबाद डेक्कन चार्जर्स (Hyderabad Deccan Chargers) संघाकडून खेळताना मुंबईविरोधातील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. रोहितने मुंबईविरोधात 6 धावात 4 बळी घेण्याची कामगिरी केली होती. विशेष म्हणजे यात रोहितने हॅट्ट्रिकदेखील घेतली होती. रोहितचा हाच रेकॉर्ड आज हर्षलने मोडीत काढला आहे.

थरारक सामन्यात बंगळुरु विजयी

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरुने 8 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी बंगळुरूकडून जलदगती गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला होता. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

(IPL 2021 RCB vs MI Harshal Patel Miss Hat Trick 5 Wicket Against Mumbai Indians)

हे ही वाचा :

MI vs RCB, IPL 2021 Match 1 Result | एबीडी व्हीलियर्सची शानदार खेळी, थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी

हर्षल पटेलकडून रोहित शर्माचा 12 वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडीत

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.