VIDEO : आगरी गाण्यावर रोहित शर्माचा ठेका, मुंबई पलटणचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबईच्या पलटनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

VIDEO : आगरी गाण्यावर रोहित शर्माचा ठेका, मुंबई पलटणचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल
Rohit Sharma Dance
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:36 AM

मुंबई : आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ (MI vs RCB) एकमेंकांविरोधात आव्हान उभं करतील. या सामन्याबाबत खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह आहे. आयपीएलच्या उत्साहात अनेक खेळाडू सराव सामन्यांचे किंवा सरावादारम्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत, तर काही खेळाडू गाण्यांचे आणि डान्सचे व्हिडीओ शेअर करत आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्सच्या पलटनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (IPL 2021 : Rohit Sharma and Mumbai Indians Paltan dance video on Marathi song Ek Naral Dilay)

या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा एका आगरी गाण्यावर (एन नारळ दिलाय… या गाण्यावर) नाचताना दिसत आहे. रोहितचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्याच्या इंस्टाग्राम हँडलसह शेअर केला आहे, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर रोहितच्या आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस सुरु केला आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर अवघ्या 22 तासांमध्ये या व्हिडीओवर 5 लाख 42 हजार लाईक्स आणि 4 हजार 600 कमेंट्स आल्या आहेत.

एक नारळ दिलाय… हे आगरी गाणं सध्या सोशल मीडियावर त्यातही प्रामुख्याने इन्स्टाग्राम रील्सवर ट्रेंडिंगला आहे. अनेक मराठी सेलिब्रेटी या गाण्यावर थिरकल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या गाण्यावर रोहित शर्मादेखील थिरकला आहे. तसेच यावेळी त्याच्यासोबत विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हेदेखील भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ पाहा

मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक करणार?

रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 च्या स्पर्धेचे जेतेपद मुंबईने पटकावले आहे. यंदा ही स्पर्धा जिंकून विजेतेपद मिळवण्याची हॅटट्रिक करायची, असा मनसुबा मुंबईच्या संघाने आखला आहे. 9 एप्रिलला ही स्पर्धा सुरु होणार असून, मुंबईचा पहिला सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरोधात आहे. यंदा आयपीएलमध्ये एकूण 56 लीग सामने खेळवले जातील. सर्व सामने चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, मुंबई आणि अहमदाबाद येथे होणार आहेत.

संबंधित बातम्या

IPL मध्ये हॅट्रिक कुणी कुणी घेतली? अमित मिश्रा आणि युवराजची जादू, रोहितचा खास अंदाज!, वाचा पूर्ण लिस्ट…

IPL 2021 : कोहलीला ‘विराट’ रेकॉर्ड करण्याची संधी, असा कारनामा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो!

IPL 2021 : ‘दुनिया हिला देंगे हम’, मुंबईची पलटन सज्ज, सहाव्यांदा चॅम्पियन बनणार?

(IPL 2021 : Rohit Sharma and Mumbai Indians Paltan dance video on Marathi song Ek Naral Dilay)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.