बेन स्टोक्स 12 आठवड्यांसाठी क्रिकेटपासून लांब, संघासोबत न राहता मायदेशी परतणार, या दिवशी सर्जरी होणार
बेन स्टोक्सला झालेल्या दुखापतीमुळे तो डगआऊटमध्ये बसून संघातील सहकाऱ्यांचा हौसला वाढवत होता परंतु आता तो मायदेशी परतणार असून येत्या सोमवारी त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया होणार आहे. | Ben Stokes
मुंबई : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स (Ben Stokes) याला आयपीएल 2021 ( IPL 2021) मधून बाहेर पडालं लागलं आहे. पंजाब किंग्जविरोधातील संघाच्या सलामीच्या सामन्यातच बेन स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला गुडबाय करावं लागतंय. आतापर्यंत तो डगआऊटमध्ये बसून संघातील सहकाऱ्यांचा हौसला वाढवत होता परंतु आता तो मायदेशी परतणार असून येत्या सोमवारी त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट परिषदेने दिली आहे. (IPL 2021 RR Allrounder Ben Stokes Out 12 Week Surgery On monday)
वेल्स क्रिकेट बोर्डाने काय म्हटलंय…?
इंग्लंड क्रिकेट बोर्ड अर्थात वेल्स क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी सांगितलं, “बेन स्टोक्स इथून पुढचे 12 आठवडे क्रिकेटपासून लांब असेल. लीड्समध्ये त्याच्यावर सोमवारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे जवळपास तीन महिने तो आता क्रिकेट खेळू शकणार नाही ”
बिनीचा शिलेदार जायबंदी, राजस्थानला मोठा धक्का
“बेन स्टोक्सचे बोट मोडल्यामुळे दुर्दैवाने त्याला आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे. स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघासोबत ऑफ फील्ड राहून मदत करेल, अशी माहिती टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली होती. मात्र तात्काळ कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे स्टोक्सला मायदेशी परतावं लागत आहे. बिनीचा शिलेदार जायबंदी झाल्यामुळे स्टोक्सची जागा कोण घेणार, याचा संघ व्यवस्थापन खल करत आहे. तर चाहत्यांचेही निर्णयाकडे डोळे लागले आहेत.
गेलचा कॅच घेताना स्टोक्सची ‘विकेट’
पंजाब किंग्जविरोधातील सामन्यात दहाव्या षटकात ख्रिस गेलचा (Chris Gayle) झेल पकडण्याच्या नादात स्टोक्सने लांब डाईव्ह घेतली, मात्र यावेळी त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. किंग्जनी 6 गडी गमावून 221 धावांचा डोंगर रचल्यानंतरही स्टोक्स मैदानात पुन्हा आला नाही. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून तो सलामीला उतरला. मात्र तीन चेंडूतच मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली आणि भोपळाही न फोडता त्याला तंबूत परतावे लागले.
स्टोक्सच्या इंज्युरीमुळे राजस्थान रॉयल्स संघाचे धाबे दणाणले आहेत. याचं कारण म्हणजे आधीच जोफ्रा आर्चर (Jofra Archer) जायबंदी आहे. तो सुरुवातीचे चार सामने खेळू न शकण्याची चिन्हं आहेत.
(IPL 2021 RR Allrounder Ben Stokes Out 12 Week Surgery On monday)
हे ही वाचा :
IPL 2021 | गेलचा झेल घेताना झाला ‘झोल’, बेन स्टोक्सवर आयपीएल 2021 सोडण्याची वेळ
IPL 2021 : दीपक चाहर ठरला पंजाबचा कर्दनकाळ, धोनीला खास सामन्याचं खास गिफ्ट!
IPL 2021 | सामन्याआधी शमीच्या पाया पडला आणि मैदान गाजवलं, दीपक चहरची अफलातून गोलंदाजी