Video : ‘उडता चेतन’, हवेत सूर मारत अविश्वसनीय कॅच ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

राजस्थान रॉयल्सचा (Rajastahn Royals) युवा खेळाडू चेतन साकारियाने (Chetan Sakariya) आश्चर्यचकित करणारा झेल घेतला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा केली जात आहे. (IPL 2021 RR vs KKR Chetan Sakariya outstanding Catch Dinesh Kartik)

Video : 'उडता चेतन', हवेत सूर मारत अविश्वसनीय कॅच ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!
चेतन साकरीयाचा अफलातून कॅच...
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 10:29 AM

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (kolkata knight Riders) खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajastahn Royals)  युवा खेळाडू चेतन साकारीयाने (Chetan Sakariya) आश्चर्यचकित करणारा झेल घेतला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा केली जात आहे. चेतन साकारीयाच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (IPL 2021 RR vs KKR Chetan Sakariya outstanding Catch Dinesh Kartik)

चेतन साकरीयाचा अविश्वसनीय कॅच

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या 18 व्या षटकात दिनेश कार्तिकने ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर कव्हरच्या डोक्यावरुन मारण्याचा प्रयत्न केला, पण तेथे फिल्डिंग करत असलेल्या चेतन साकारीयाने हवेत उडी मारणारा झेल पकडला. हवेत सूर मारुन चेतन साकारियाने दिनेश कार्तिकचा अतिशय कठीण झेल घेतला.

दिनेश कार्तिकचा झेल पकडल्यानंतर चेतन साकारीयाने आपले दोन्ही हात समांतर दिशेने पसरवून अनोख्या पद्धतीने साजरे केले. चेतन साकारियाने अप्रतिम झेल घेऊन दिनेश कार्तिकला तंबूत जायला भाग पाडले. चेतनच्या या कॅचबद्दल संघातील सहकाऱ्यांनी देखील त्याची भरभरुन स्तुती केली.

ख्रिस मॉरिसचं शानदार बोलिंग प्रदर्शन

शनिवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिसच्या तुफानी गोलंदाजीच्या बळावर राजस्थानने हा सामना जिंकला.

राजस्थान रॉयल्सकडून ख्रिस मॉरिसने 4 षटकांत 23 धावा देऊन 4 बळी घेतले. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 34 धावा केल्या तर दिनेश कार्तिकने 25 धावा केल्या. याशिवाय नितीश राणाने 22 धावा केल्या. राजस्थानने 18.5 षटकांत चार विकेट्स गमावून 134 धावांचे लक्ष्य गाठले.

(IPL 2021 RR vs KKR Chetan Sakariya outstanding Catch Dinesh Kartik)

हे ही वाचा :

IPL Purple Cap : दिग्गजांना पछाडत भारतीय युवा बोलर्स अग्रस्थानी, बॅट्समनचा ठरतोय कर्दनकाळ!

Video : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा…!

IPL 2021 : ‘या’ गोष्टीत मोहम्मद सिराज बुमराहच्याही ‘एक पाऊल पुढे!’, आशिष नेहराचं मोठं वक्तव्य

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.