Video | कॅप्टन कोहलीचा कानमंत्र, शाहबाज अहमदच्या एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स, अन् सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला
शाहबाज अहमदने (shahbaz ahmed take 3 wickets) हैदराबाद विरुद्धच्या (sunrisers hyderabad) सामन्यातील 17 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या.
चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 6 वा सामना (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) जिंकला आहे. हा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. बंगळुरने प्रथम फलंदाजी करत हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांसमोर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि गोलंदाज शाहबाद अहमद (Shahbaz Ahmed) ही जोडी बंगळुरुच्या विजयाची शिल्पकार ठरली. (ipl 2021 srh vs rcb royal challengers bangalore shahbaz ahmed take 3 wickets in 17th over against sunrisers hyderabad)
Onto the next one ❤️?@RCBTweets pic.twitter.com/Lt4woVr8oA
— Virat Kohli (@imVkohli) April 14, 2021
शाहबाज अहमदची शानदार बोलिंग
शाहबाज अहमद बंगळुरुच्या विजयाचा हिरो ठरला. 16 वी ओव्हर संपल्यानंतर अडीच मिनिटांचा टाईम आऊट झाला होता. या दरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपल्या खेळाडूंसोबत चर्चा केली. या दरम्यान विराटनेही आपल्या सहकाऱ्यांसोबत विजयी प्लॅन आखला.
An absolute sensational over from Shahbaz Ahmed.
Picks up the wickets of Jonny Bairstow, Manish Pandey and Abdul Samad.
Live – https://t.co/apVryOzIWv #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/SE8K5VU0J2
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
17 वी ओव्हर आणि हैदराबादचा बाजार उठला
विराटने ठरलेल्या रणनितीनुसार 17 वी ओव्हर शाहबाजला टाकायला दिली. शाहबाजने विराटचा विश्वास सार्थ ठरवला. हीच ओव्हर या सामन्याची टर्निंग पॉइंट ठरली. शाहबाजने या ओव्हरमध्ये हैदराबादच्या 3 महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं. शाहबाजने या ओव्हरमधील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडे या सेट जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अब्दूल समदला भोपळाही फोडू दिला नाही.
Well Done Shahbaz Ahmed ??❤️#SRHvRCB pic.twitter.com/HSjsg4O5s9
— Oreo (@Oreohotchoco) April 14, 2021
शाहबाजने या ओव्हरमध्ये घेतलेल्या 3 विकेट्समुळे सामना पूर्णपणे बंगळुरुच्या बाजूने झुकला. हैदराबाज विजयी आव्हानाच्या दिशेने सहजपणे पोहचेल असं वाटताना अहमदने हैदराबादला रोखलं. शाहबाजने आपल्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.
मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलची चांगली साथ
शाहबाजला मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलने चांगली साथ दिली. या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. सिराजने रिद्धीमान साहा आणि जेसन होल्डरला बाद केलं. तर हर्षल पटेलने विजय शंकर आणि शाहबाज नदीमला माघारी धाडलं.
ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळी
त्याआधी बंगळुरुकडून अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतक झळकावलं. ग्लेनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 7 वं अर्धशतक ठरलं. ग्लेनने एकूण 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 सिक्ससह 59 धावांची खेळी केली. ग्लेनने 2016 नंतर पहिल्यांदा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं. ग्लेनच्या 59 धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरुला निर्धारित 20 षटकांमध्ये 149 धावांपर्यंत मजल मारता आली.
बंगळुरुचा सलग दुसरा विजय
हैदराबादला पराभूत करत विराटसेनेने या मोसमातील सलग दुसरा विजय साकारला. याआधी बंगळुरुने या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे बंगळुरुला पुढील सामना जिंकत विजयाची हॅटट्रिक लगावण्याची संधी आहे.
संबंधित बातम्या :
SRH vs RCB Live Score, IPL 2021 | शाहबाज अहमदची शानदार गोलंदाजी, मॅक्सवेलचे अर्धशतक, बंगळुरुचा सलग दुसरा विजय, हैदराबादवर 6 धावांनी मात
Glenn Maxwell | ग्लेन मॅक्सवेलचा धमाका, 2016 नंतर झळकावलं अर्धशतक
(ipl 2021 srh vs rcb royal challengers bangalore shahbaz ahmed take 3 wickets in 17th over against sunrisers hyderabad)