IPL 2021 | सनरायजर्स हैदराबादच्या डोकेदुखीत वाढ, स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त
सनरायजर्स हैदराबादचा (sunrisers hyderabad) स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (bhuvneshwar kumar injured) पुन्हा एकदा दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे हैदराबादसाठी ही धोक्याची घंटा आहे.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्सवर 9 विकेट्सने मात करत हंगामातील पहिला विजय साकारला. या विजयानंतर हैदराबादसाठी एक वाईट बातमी आली आहे. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या हैदराबादच्या अडचणीत वाढ झाली आहे. (ipl 2021 sunrisers hyderabad bowler bhuvneshwar kumar injured)
नक्की काय झालं?
भुवनेश्वरला पंजाब विरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. भुवनेश्वरने पंजाब विरुद्ध पावरप्लेमधील 6 ओव्हरपैकी 3 ओव्हर गोलंदाजी केली. यामध्ये भुवीने 16 धावा देत केएल राहुलची मोठी विकेट घेतली. मात्र यानंतर भुवी मैदानाबाहेर गेला. त्याच्या कोट्यातील 1 ओव्हर शिल्लक होती. त्यानंतरही भुवी मैदानाबाहेर का गेला, याबाबत सर्व क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला. मात्र भुवीला दुखापत झाल्याची माहिती मुळची भारतीय असलेली आणि ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने दिली. भुवनेश्वरच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना त्रास होत आहे.
भुवनेश्वरला झालेली दुखापत ही तीव्र की सौम्य स्वरुपाची आहे, याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र जर या दुखापतीमुळे भुवीला या मोसमाला मुकावे लागले तर हा हैदराबादसाठी मोठा धक्का असू शकतो.
भुवनेश्वर आणि दुखापत
भुवनेश्वरला दुखापत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही मागील मोसमात भुवीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे भुवीला 13 व्या मोसमाला मुकावे लागले होते. मात्र त्यानंतर भुवीने दुखापतीतून सावरत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केलं. मात्र आता पुन्हा एकदा भुवी दुखापतग्रस्त झाला आहे.
हैदराबादचा पुढील सामना केव्हा?
हैदराबादचा या मोसमातील पुढील सामना 25 एप्रिलला चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात हैदराबादची गाठ दिल्ली कॅपिट्ल्ससोबत पडणार आहे. हैदराबाद ताज्या आकडेवारीनुसार 2 पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 sunrisers hyderabad bowler bhuvneshwar kumar injured)