IPL 2021 :15 कोटीच्या पॅट कमिन्सला 19 वर्षीय अब्दुलने दाखवली ‘ताकद’, असा षटकार ठोकला की कायम आठवणीत राहिल!

हैदराबादला जेव्हा कमी चेंडूत अधिक धावांची गरज होती तेव्हा हैदराबादच्या अब्दुल समदने (Abdul Samad) आपल्या बॅटची ताकद दाखवली. त्याने 15 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) चेंडूला स्टेडियमच्या बाहेर धाडलं. | Abdul Samad Hit Two Longest Sixes

IPL 2021 :15 कोटीच्या पॅट कमिन्सला 19 वर्षीय अब्दुलने दाखवली 'ताकद', असा षटकार ठोकला की कायम आठवणीत राहिल!
Abdul Samad Sixes
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 6:43 AM

चेन्नई :  आयपीएल 2021 स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) हा तिसरा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidabaram Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी मात केली. कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवले नाही. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो (55) आणि मनिष पांडे (61) या दोघांचे प्रयत्न कमी पडले. सामन्यादरम्यान हैदराबादला जेव्हा कमी चेंडूत अधिक धावांची गरज होती तेव्हा हैदराबादच्या अब्दुल समदने (Abdul Samad) आपल्या बॅटची ताकद दाखवली. त्याने 15 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) चेंडूला स्टेडियमच्या बाहेर धाडलं. आक्रमक खेली करत सामन्यात रंग भरला पण त्याचेही प्रयत्न असफल ठरले. (IPL 2021 Sunrisers Hydrabad vs Kolkana Knight Riders Abdul Samad Hit Two Longest Sixes pat Cummins Bowling)

अब्दुल समदच्या बॅटमधून दोन तडाखेबाज सिक्सेस

हैदराबादची टीम कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत होती. हैदराबादच्या डावाची सुरुवात अतिषय खराब झाली. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये हैदराबादचे सलामीवीर तंबूत परतले होते. मग मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक खेळी करुन हैदराबादला विजयाची स्वप्न दाखवली. पण विजय दृष्टीक्षेपात असताना दोघेही आऊट झाले. साहजिक कुणीतरी दुसऱ्या बॅट्समनने येऊन फटकेबाजी करणं गरजेचं होतं. ही कमी अब्दुल समदने भरुन काढली. हैदराबादच्या डावाच्या 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अब्दुल समदने लेगसाईडला एक उत्तुंग षटकार ठोकला. तो षटकार एवढा लांब होता की बॉलरही पाहत राहिला. 93 मीटर्सचा तो षटकार होता.

पुन्हा दुसऱ्या बॉलवर यॉर्कर बॉल असताना देखील त्याने बॉलला खणून काढत सीमारेषेपार पाठवलं. हा षटकार तर पाहण्याजोगा होता. 15 कोटींच्या पॅट कमिन्सला 19 वर्षीय अब्दुल समदने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली.

पाठीमागच्या मोसमात आयपीएल 2020 मध्ये केकेआरने 15 कोटी रुपयांना खरेदी करुन आपल्या संघात सामिल करुन घेतलं. कमिन्स जगातल्या घातक गोलंदाजांपैकी एक मानला जातो. परंतु त्याच्याही बॉलवर उत्तुंग षटकार मारत समदने ताकद दाखवून दिली.

‘राणा’दाने विजयाचा पाया रचला

केकेआर विरुद्ध एसआरएच सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. या सामन्यात कोलकात्याचा सलामीवीर नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने (53) अर्धशतक ठोकत कोलकात्याला मजबूत धावसंख्या उभारून दिली. शेवटच्या षटकात फटकेबाजी करत दिनेश कार्तिकने कोलकात्याला 180 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

कोलकात्याची टिच्चून गोलंदाजी

कोलकात्याने हैदराबादला 188 धावांचे आव्हान दिले होते. केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत या आव्हानाचा बचाव केला. त्यातही प्रामुख्याने शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे हैदराबादला विजयी आव्हान पूर्ण करता आले नाही. अखेर कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

(IPL 2021 Sunrisers Hydrabad vs Kolkana Knight Riders Abdul Samad Hit Two Longest Sixes pat Cummins Bowling)

हे ही वाचा :

SRH vs KKR, IPL 2021 Match 3 Result | कोलकाता ‘जितबो रे’, हैदराबादवर 10 धावांनी विजय

SRH vs KKR : शेर कभी बुडा नही होता! दोन संघांना IPL चषक मिळवून देणारा 40 वर्षीय खेळाडू मैदानात

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.