IPL 2021 : सिडनीच्या या व्हायरल कपलचा सपोर्ट कुणाला, MI की RCB? त्यांची टीम हरली की जिंकली? पुढे काय झालंय तुम्हीच पाहा

मुंबई विरुद्ध बंगळुरुचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. या मॅचदरम्यान अनेक क्रिकेट रसिकांना सिडनीच्या 'त्या' व्हायरल कपलची आठवण झाली. त्या व्हायरल कपलने कुणाला सपोर्ट केला असावा? असे प्रश्न क्रिकेट रसिकांना पडले. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. | Sydney Viral Couple

IPL 2021 : सिडनीच्या या व्हायरल कपलचा सपोर्ट कुणाला, MI की RCB? त्यांची टीम हरली की जिंकली? पुढे काय झालंय तुम्हीच पाहा
सिडनीचं व्हायरल कपल...
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 7:47 AM

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा (IPL 2021) श्रीगणेशा कालपासून झालाय. सलामीची मॅच गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात पार पडली. प्रथा परंपरेप्रमाणे मुंबईचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला आणि बंगळुरुने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून आयपीएल स्पर्धेत थाटात सुरुवात केली. दरम्यान सामना अतिशय रोमांचकरित्या पार पडला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. या मॅचदरम्यान अनेक क्रिकेट रसिकांना सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल कपलची आठवण झाली. त्या व्हायरल कपलने कुणाला सपोर्ट केला असावा? असे प्रश्न क्रिकेट रसिकांना पडले. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. (IPL 2021 Sydney Viral Couple Which Team Support Mi or RCB)

ऑस्ट्रेलियन मैत्रिणीला भर मैदानात प्रेमाचा इजहार, ‘कबुल हैं’ म्हणत तिचाही होकार!

सिडनीच्या ऐतिहासिक क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एका भारतीय फॅन्सने त्याची ऑस्ट्रेलियन मैत्रिणीला भर मैदानात प्रेमाचा इजहार केला. तिनेही ‘कबुल हैं..’ म्हणत त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. हाच गोड गुलाबी क्षण लाखो क्रिकेट रसिकांनी टीव्हीवर पाहिला. साहजिक काहीव सेकंदात हे कपल जगात व्हायरल झालं. जिकडं तिकडं फक्त याच कपलची काही दिवस चर्चा होती.

व्हायरल कपलने कुणाला केलं सपोर्ट?

ज्या भारतीय मुलाने त्याच्या ऑस्ट्रेलियन मैत्रिणीला प्रपोज केलं त्याचं नाव आहे दिपेन मंडालिया आणि त्याच्या मैत्रिणीचं नाव आहे रोज विमबुश… या दोघांनाही आयपीलएची खूप उत्सुकता होती. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत आम्ही विराटच्या नेतृत्वाखालील रेड आर्मीला म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सपोर्ट करत असल्याचं सांगितलं.

कपलच्या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सुरु असताना मैदानात मॅच पाहायला आलेल्या भारतीय फॅन्सनी त्याच्या ऑस्ट्रेलियन मैत्रीणीला प्रेमाचं प्रपोजल दिलं. तिनेही क्षणाचा विलंब न लावता त्याला होकार दिला. जणू त्याच्याच प्रपोजलची ती वाट पाहत असावी. त्यानेही मग आपला प्रपोज सर्वोत्तम ठरवा, यासाठी सोबत आणलेली अंगठी मैत्रिणीच्या बोटात घातली. या गोड क्षणांनी ती लाजेने चुर्रर्र झाली. टीव्हीवरील लाखो लोकांनी हा प्रपोज तर पाहिला पण मैदानावरील खेळाडूही या गुलाबी क्षणांचे साक्षीदार झाले.

(IPL 2021 Sydney Viral Couple Which Team Support Mi or RCB)

हे ही वाचा :

IPL 2021 : हर्षल पटेलची हॅट्रिक हुकली पण मुंबईविरुद्ध कुणालाही जमली नाही अशी कामगिरी करुन दाखवली!

MI vs RCB, IPL 2021 Match 1 Result | एबीडी व्हीलियर्सची शानदार खेळी, थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी

संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.