IPL 2021 | ठरलं, आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच
कोरोनामुळे आयपीएलच्या या 13 मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं.
मुंबई : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन (IPL 2021) भारतात करण्यात येणार आहे. या मोसमाला एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. तसेच साखळी सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईलगत असलेल्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मात्र अजूनही बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (ipl 2021 to likely held commence from 2nd week of april and it ll be staged in india)
According to TOI, IPL 2021 finals likely to happen on 5th or 6th June.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 31, 2021
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला काही महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली होती. या 13 मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे या 14 व्या मोसमाचं आयोजन भारतात होणार की आणखी कुठे, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला होता. मात्र आता 14 वा मोसम भारतात खेळण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
मुंबई नजीकच्या परिसरात साखळी सामने
टीओआयनुसार, आयपीएलच्या 14 व्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईनजीकच्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत. तसेच अहमदाबादमधील मोटेरा आणि सरदार पटेल स्टेडियममध्ये बाद फेरीतील (Knock Out) सामन्यांचं आयोजन केलं जाणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
According to TOI, the BCCI has earmarked Wankhede, Brabourne, DY Patil, Reliance Cricket Stadium and Maharashtra Cricket Association Stadium to host IPL 2021. Motera Stadium likely to be considered for the knockouts.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 31, 2021
गांगुली काय म्हणाला होता?
“फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनावर लस सापडल्यास नक्कीच या आगामी पर्वाचं आयोजन भारतात केलं जाईल”, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता.
लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला
आगामी 14 व्या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया ही 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणार आहे. याबाबतची माहिती आयपीएल प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ट्विटद्वारे दिली होती. या लिलाव प्रक्रियेसाठी प्रत्येक फ्रँचायजीने आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामुळे या लिलाव प्रक्रियेत कोणता खेळाडू हा महागडा ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.
?ALERT?: IPL 2021 Player Auction on 18th February?️
Venue ?: Chennai
How excited are you for this year's Player Auction? ??
Set your reminder folks ?️ pic.twitter.com/xCnUDdGJCa
— IndianPremierLeague (@IPL) January 27, 2021
संबंधित बातम्या :
IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं
(ipl 2021 to likely held commence from 2nd week of april and it ll be staged in india)