गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच ड्वेन ब्राव्हो क्रीजबाहेर, संतापलेल्या व्यंकटेश प्रसादने ICC ला जाब विचारला

IPL 2021 स्पर्धेत सोमवारी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) असा सामना खेळवण्यात आला.

गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच ड्वेन ब्राव्हो क्रीजबाहेर, संतापलेल्या व्यंकटेश प्रसादने ICC ला जाब विचारला
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 7:11 PM

मुंबई : IPL 2021 स्पर्धेत सोमवारी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईची फलंदाजी सुरु असतानाचा ड्वेन ब्राव्होचा (Dwayne Bravo) एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. तसंच क्रिकेटच्या काही नियमांवर टीकादेखील सुरु झाली आहे. या फोटोत दिसतंय की, राजस्थानचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्राईकर एंडला उभा असलेल्या ड्वेन ब्राव्होने रहमानने चेंडू टाकण्याआधीच क्रीज सोडलंय. क्रीजपासून तो खूप लांब पोहोचला आहे. परंतु क्रीजपासून केवळ एक इंच पाय पुढे होता म्हणून रहमानचा तो चेंडू ‘नो बॉल’ घोषित करण्यात आला. (IPL 2021 : Venkatesh Prasad Speak In Favour Of Mankading After Dwayne Bravo Was Seen Backing Up Yards Against Rajasthan Royals)

क्रीझपासून एक इंच पाय पुढे होता म्हणून मुस्तफिजूर रहमानने टाकलेला चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला, मात्र त्याच वेळी चेंडू टाकण्याआधीच क्रीझपासून काही यार्ड्स पुढे गेलेल्या ड्वेन ब्राव्होला कोणी काहीच बोललं नाही. त्याला कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाही. ही गोष्ट अनेकांना पटलेली नाही. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) हा प्रकार पाहून संतापला आहे. प्रसादने या प्रसंगाचा एक फोटो ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘गोलंदाजाने काही इंच पाय पुढे टाकला तर त्याला दंड बसतो. बॅट्समन काही यार्ड पुढे गेला असला तरी त्याला काही शिक्षा होत नाही. या प्रकारच्या बॅट्समला रन-आऊट करण्याचा गोलंदाजाला पूर्ण अधिकार आहे. या गोष्टीला ‘Spirit of the game’ असं बोलणं म्हणजे एक जोक आहे, असे म्हणत प्रसादने या ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) टॅग केले आहे.

Spirit Of Cricket चा वाद सुरु होण्यापूर्वीच थांबला

हा प्रसंग घडत असताना मुस्तफिजूर रहमानच्या (Mustafizur Rahman) अनावधानाने ‘Spirit Of Cricket’ चा एक मोठा वाद सुरु झाला नाही. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये या विषयावर सातत्यानं दोन्ही बाजूनं मतं प्रदर्शित केली जात आहेत. रहमानचं लक्ष नव्हतं म्हणून हा वाद सुरु झाला नाही. जर त्याच्याजागी रवीचंद्रन अश्विनसारखा सजग गोलंदाज असता तर त्याने ब्राव्होला बाद केलं असतं, किंवा मागच्या आयपीएलप्रमाणे (IPL 2020) त्याने किमान बॅट्समनला त्याच्या चुकीची जाणीव करुन दिली असती. पण तिथे अश्विन नव्हे तर मुस्तफिजूर रहमान गोलंदाजी करत होता. ही गोष्ट रहमानच्या लक्षात आली नाही. त्यामुळे मोठा वाद झाला नाही.

संबंधित बातम्या

IPL 2021: कॅप्टन कुलचा कारनामा, रोहित-विराटला पछाडत केला ‘हा’ पराक्रम

IPL 2021 DC vs MI Head to Head | गत मोसमात मुंबई इंडियन्सकडून 4 वेळा पराभव, दिल्ली पंतच्या नेतृत्वात कमाल करणार?

(IPL 2021 : Venkatesh Prasad Speak In Favour Of Mankading After Dwayne Bravo Was Seen Backing Up Yards Against Rajasthan Royals)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.