IPL 2021 : ‘पॉली काकाने चेन्नईला काय धू धू धुतलं’, वीरेंद्र सेहवागचं मजेशीर ट्विट व्हायरल!

कायरन पोलार्डच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (MI) धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) 4 विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. त्याच्या याच धमाकेदार खेळीवर भारताचा दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने मजेशीर ट्विट केलं आहे. 'पॉली काकाने चेन्नईला काय धू धू धुतलं', असं तो म्हणाला. (Virendra Sehwag tweet on Kieron pollard)

IPL 2021 : 'पॉली काकाने चेन्नईला काय धू धू धुतलं', वीरेंद्र सेहवागचं मजेशीर ट्विट व्हायरल!
पोलार्डच्या खेळीवर वीरेंद्र सेहवागचं मजेशीर ट्विट
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 2:57 PM

मुंबई : कायरन पोलार्डच्या (Kieron pollard) वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (MI) धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) 4 विकेट्स राखून थरारक विजय मिळवला.  चेन्नईने 218 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलार्डने अशक्य वाटणारी धावसंख्या आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर शक्य करुन दाखवली. पोलार्डने 34 चेंडूत नाबाद 87 धावा ठोकत, चेन्नईचं 219 धावांचे तगडे आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केलं. पोलार्डने 6 फोर आणि 8 सिक्स ठोकले. चेन्नईच्या बोलर्सला त्याने अक्षरश: बॅटने तुडवलं. त्याच्या याच धमाकेदार खेळीवर भारताचा दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने मजेशीर ट्विट केलं आहे. ‘पॉली काकाने चेन्नईला काय धू धू धुतलं’, असं ट्विट करत त्याने पोलार्डच्या खेळीचं कौतुक केलं आहे. (IPL 2021 Virendra Sehwag tweet on Kieron pollard record break inning Against Chennai Super Kings)

पोलार्डचा तडाखा, चेन्नई भुईसपाट

पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून ज्या प्रकारे मुंबईला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला, तो अफलातून होता. पोलार्डच्या या खेळीनंतर सगळा सोशल मीडिया पोलार्डमय झाला. सोशल मीडियात त्याच्या नावाचा डंका पाहायला मिळाला. शेर चाहे कितना भी बुढा हो जाये, वो घास नहीं खाता, असं म्हणत तुल्यबळ विरोधकासमोर पोलार्डच्या जलव्याचं मुंबईचे फॅन्स वर्णन करु लागले.

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

वीरेंद्र सेहवागनेही मॅच संपल्यानंतर एक मजेशीर ट्विट केलं. ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो, पॉली काका काय खेळलास यार…. तू चेन्नईला तुडवलंस, धू धू धुतलं….! आपल्या ट्विटमधून त्याने पोलार्डची तोंडभरुन स्तुती केलीय.

केवळ 17 चेंडूत पोलार्डचं अर्धशतक

पोलार्डने सुरुवातीपासूनच चेन्नईच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. जडेजाला त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकत त्याचे इरादे स्पष्ट केले. कायरन पोलार्डने चौकार ठोकत मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक लगावलं. पोलार्डने केवळ 17 चेंडूत 3 फोर आणि 6 सिक्ससह अर्धशतक लगावलं. अर्धशतकानंतर पोलार्डने बॅट, हेल्मेट काढून जमिनीवर ठेवले आणि हात जोडून आकाशाकडे पाहून डोळे घट्ट मिटून उभा राहिला.

पोलार्डचे 8 उत्तुंग षटकार

पोलार्डने आपल्या खेळीत एकूण 8 षटकार लगावले. त्यापैकी 3 षटकार हे 90 मीटरपेक्षा अधिक लांबीचे लगावले. पोलार्डने 93, 97 आणि 105 मीटर लांबीचे गगनचुंबी सिक्स लगावले. त्याला नेहमीच चेन्नईविरुद्ध षटकार ठोकायला आवडतं. शनिवारच्या मॅचमध्ये त्याने करिश्मा करुन दाखवला.

(IPL 2021 Virendra Sehwag tweet on Kieron pollard record break inning Against Chennai Super Kings)

हे ही वाचा :

IPL 2021 : विराट कोहलीला ओपनिंगवरुन हटवा आणि ‘या’ खेळाडूला पाठवा, वीरेंद्र सेहवागचा बंगळुरुला सल्ला

IPL 2021 RR vs SRH Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, आणि कसा पाहणार?

IPL 2021 : रोहितच्या पलटणने आस्मान दाखवलं, मॅच चेन्नईच्या हातून कधी निसटली? धोनीने सांगितला नेमका ‘तो’ क्षण!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.