IPL 2022 Orange Cap : हार्दिक पांड्या जॉस बटलरमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस, पांड्या काही धावांनी पिछाडीवर
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलरने (Jos Buttler) ऑरेंज कॅप (Orange Cap) टेबलमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) काही क्षणातच शानदार 87 धावा करून कॅप हिसकावली होती. पण बटलरने 24 चेंडूत 54 धावा करत पाच डावात 272 धावांची आघाडी घेतली.
मुंबई – राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलरने (Jos Buttler) ऑरेंज कॅप (Orange Cap) टेबलमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) काही क्षणातच शानदार 87 धावा करून कॅप हिसकावली होती. पण बटलरने 24 चेंडूत 54 धावा करत पाच डावात 272 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे ऑरेंज कॅप जॉस बटलरकडे कायम राहिली आहे. पांड्याने आत्तापर्यंत झालेल्या समान्यात 228 धावा केल्या आहेत. तर CSK चा शिवम दुबे 207 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Jos Buttler maintains his lead, and Hardik Pandya advances to second place on the table.#Cricket #CricTracker #GujaratTitans #RRvGT #JosButtler #RajasthanRoyals #HardikPandya #OrangeCap pic.twitter.com/wdUQ6daPAO
— CricTracker (@Cricketracker) April 14, 2022
हार्दीकच्या खेळीमुळे गुजरात टायटन्सचा विजय
हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. गुजरात टायटन्सने गुरुवारी डीवाय पाटील स्टेडियमवर 37 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. कालच्या समान्यात पांड्याने 87 धावा करून एक विकेट घेतली आहे. तसेच जॉस बटलरने सुध्दा 24 चेंडूत 54 धावा केल्या आहेत.
रॉबिन उथप्पा, शिवम दुबे दोघांकडून चाहत्यांचं मनोरंजन
उथप्पाने फक्त 50 चेंडूत 88 धावा केल्या, तर दुबेने 46 चेंडूत 94 धावा केल्या. कारण त्यांनी अपवादात्मक खेळींमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणे सुरू ठेवले आहे. या जोडीने फ्रँचायझीसाठी एक नवीन विक्रम नोंदवण्यासाठी एकूण 17 षटकारही मारले. ऑरेंज कॅप शर्यतीत ते टॉप 3 मध्ये पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटरने ऑरेंज कॅप लीडरबोर्डमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. आयपीएल 2022 च्या पहिल्या शतकासह, बॅक-टू-बॅक प्रभावी खेळी केली आहे. लखनौ सुपरजायंट्स यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि गुजरात टायटन्स सलामीवीर शुभमन गिल देखील सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 यादीत आहे. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेने सीएसके जर्सी घातल्यानंतर त्याचे नशीब बदलल्याचे दिसत आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे पुनरुत्थान करण्यासाठी आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी या दोघांनी विक्रमी 165 धावांची भागीदारी करून महत्त्वपूर्ण खेळी खेळली. RRचा जोस बटलर 218 धावांसह आघाडीवर आहे.