IPL 2022 : युझवेंद्र चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर, ऑरेंज कॅप जॉस बटलरकडे कायम
युझवेंद्र चहल 11 सामन्यांत 22 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर वानिंदू हसरंगा (21) दुसऱ्या स्थानावर आहे. कागिसो रबाडा (18) क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर आहे,
मुंबई – काल आयपीएलचा (IPL 2022) 55 वा सामना चैन्नई (CSK) आणि दिल्लीमध्ये झाला. चैन्नई संघाने दिल्लीचा 91 धावांनी पराभव केला. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 20 चेंडूत 25 धावा दिल्ली निघाल्या. दिल्ली संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ 17.4 षटकांत सर्वबाद 117 धावांवर आटोपला. त्यामुळे सामना पाहायला दिल्लीच्या प्रेक्षकांची काल निराशा झाली. काल चैन्नईच्या संघाची कामगिरी चांगली झाली. सीएसकेसाठी मोईन अलीने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 13 धावा देत 3 बळी घेतले. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर मोईनने डीसीच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले.
चैन्नईला त्यांचे पुढील तीन सामने जिंकावे लागतील
झालेल्या विजयासह चैन्नई संघाचे 8 गुण झाले आहेत. काल झालेल्या पराभवानंतर दिल्लीचे केवळ 10 गुण झाले आहेत. आता चैन्नईला त्यांचे पुढील तीन सामने जिंकावे लागतील. तसेच प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना निव्वळ धावगती सुधारावी लागेल.
पर्पल कॅप रेस
युझवेंद्र चहल 11 सामन्यांत 22 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर वानिंदू हसरंगा (21) दुसऱ्या स्थानावर आहे. कागिसो रबाडा (18) क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर आहे, कुलदीप यादव (18) चौथ्या क्रमांकावर पर्पल कॅप शर्यतीत आहे. टी नटराजन 17 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे. पुढच्या दोन दिवसात पर्पल कॅपमधील रश्शी खेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ऑरेंज कॅप रेस
ऑरेंज कॅप शर्यतीत जॉस बटलर 11 सामन्यांत 618 धावांसह आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल (451) दुसऱ्या क्रमांकावर आहे. फाफ डू प्लेसिस (389) तिसऱ्या स्थानावर आहेत. तर शिखर धवन (381) चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर (375) पाचव्या स्थानावर आहे.