IPL 2023 : पंजाब किंग्सचा 11.5 कोटींचा प्लेयर ‘बेपत्ता’! कर्णधार शिखर धवनचं टेन्शन वाढलं

आयपीएल इतिहासात पंजाब किंग्सला अजूनपर्यंत एकाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. गेल्या 15 आयपीएल पर्वाापासून जेतेपदासाठी धडपड सुरु आहे. त्यात महागडे खेळाडू घेऊनही हवं तसं यश मिळालं नाही.

IPL 2023 : पंजाब किंग्सचा 11.5 कोटींचा प्लेयर 'बेपत्ता'! कर्णधार शिखर धवनचं टेन्शन वाढलं
IPL 2023 : पंजाब किंग्सचा 11.5 कोटींचा प्लेयर गेला कुठे? कर्णधार शिखर धवनला आलं टेन्शनImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:31 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत पंजाब किंग्सची चांगली सुरुवात झाली आहे. सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्स पराभवाचं पाणी पाजलं आहे. सलग दोन विजय मिळवल्यानंतरही कर्णधार शिखर धवनचं टेन्शन वाढलं आहे. शिखर धवनला 11.5 कोटीच्या खेळाडूचं टेन्शन आलं आहे. कारण इंग्लंडचा आक्रमक खेळाडू लियम लिविंगस्टन अजून संघात सहभागी झालेला नाही. त्यात तो कधीपासून सामने खेळेल याबाबत कोणतीच माहिती नाही. त्यामुळे कर्णधार शिखर धवनसह फ्रेंचाईसीची धाकधूक वाढली आहे.

लिविंगस्टन इंग्लंडमध्ये नेट प्रॅक्टिस करत आहे. त्याचबरोबर मॅनचेस्टरच्या ग्राउंडमध्ये सामना पाहताना दिसला होता. काउंटीमध्ये लँकशर आणि सरे हे दोन संघ आमनेसामने होते.दुसरीकडे, लिविंगस्टनला आयपीएल 2023 स्पर्धा खेळण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.

पंजाब किंग्सने राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर टीम मॅनेजमेंटमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, लिविंगस्टन पुढच्या आठवड्यात संघात असेल. तर क्रिकबजच्या एका बातमीनुसार , लिविंगस्टन 15 एप्रिलला भारतात येईल असं सांगण्यात आलं आहे.

पंजाब किंग्सच्या 15 एप्रिलपर्यंत 14 सामन्यापैकी 5 सामने झालेली असतील. दुसरीकडे लिविंगस्टोन फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असून डिसेंबरपासून मैदानापासून दूर आहे.

आयपीएल गुणतालिकेत दोन विजयासह पंजाब किंग्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर +0.700 च्या धावगतीने गुजरात टायटन्सचा संघ आहे. तर +0.333 च्या धावगतीने पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचा तिसरा सामना 9 एप्रिल रोजी सनराईजर्स हैदराबाद, चौथा सामना 13 एप्रिलला गुजरात टायटन्ससोबत आणि पाचवा सामना 15 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्ससोबत आहे.

पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबला विजयी घोषित करण्यात आलं. तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अतितटीच्या सामन्यात पंजाबने 5 धावांनी विजय मिळवला.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सची सर्वोत्तम Playing XI: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, लियम लिविंगस्टन, शाहरुख खान, जितेश शर्मा, सॅम कर्रन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, हरप्रीत बरार.

पंजाबचा पूर्ण : शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, हरप्रीत बरार, लियम लिविंगस्टन, राज अंगद बावा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषि धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, सैम कर्रन, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, विद्धवत, मोहित राठी, शिवम सिंह.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.