IPL 2023 : स्पर्धा सुरु झाल्यानंतरही दिग्गज खेळाडूचं जर तर, शाहरुखच्या केकेआर संघाचं टेन्शन वाढलं

कोलकाता नाईट राईडर्सची स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे उर्वरित सामने जिंकण्यासाठी संघ ताकद लावणार यात शंका नाही. पण अजूनही फॉर्मात असलेला दिग्गज खेळाडू संघात नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.

IPL 2023 : स्पर्धा सुरु झाल्यानंतरही दिग्गज खेळाडूचं जर तर, शाहरुखच्या केकेआर संघाचं टेन्शन वाढलं
IPL 2023 : शाहरुखच्या केकेआर संघाला मोठा धक्का, या दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 7:25 PM

मुंबई – शाहरुखच्या कोलकाता नाईट राईडर्स संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सनं कोलकात्याचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबचा 7 धावांनी विजय झाला. पहिल्या पराभवानंतर आता कोलकाता नाईट राईडर्सचं टेन्शन काही केल्या कमी होत नाही. अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने आयपीएल 2023 स्पर्धेतून माघार घेतली होती. शाकिबला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून आयपीएल खेळण्यासाठी एनओसी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आता लिटन दासबाबतही असंच काहीसं झाल्याने कोलकात्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

लिटन दाससाठीही कोलकाता नाईट राईडर्सला काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. लिटन दासलाही बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एनओसी दिलेली नाही. मीरपूरमध्ये आयर्लंड विरुद्ध एक कसोटी सामना खेळणं बाकी आहे. हा सामना 8 एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर 9 एप्रिलला तो कोलकात्यात येईल. मात्र त्यानंतरही त्याला परत मायदेशी जावं लागणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लिटन दास 14 एप्रिलला हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळेल. त्यानंतर 29 एप्रिलला पुन्हा मायदेशी परतेल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याला 9 मेला सुरु होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी बोलवलं आहे. बांगलादेश मालिकेपूर्वी आयर्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. कोलकाता नाईट राईडर्सने शाकिबला आपल्या संघात 1.5 कोटी खर्च करून घेतलं होतं. तर लिटन दासला 50 लाखांच्या बेस प्राईसवर संघात सहभागी केलं होतं.

कोलकाता नाइट राइडर्स

कोलकाता नाइट राइडर्स सर्वोत्तम Playing XI: सुनील नरेन, वेंकटेश अय्यर,नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, नारायण जगदीशन, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी.

कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.