IPL 2023 CSK vs LSG | सामन्यापूर्वी चेपॉक मैदानात घुसखोरी, 5 मिनिटं सुरु होती पकडापकडी Watch Video
आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. मात्र हा सामना सुरु होण्यापूर्वी असं काही घडलं की कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणार येत चालली आहे. जेतेपद पटकवण्यासाठी हिशेबाने प्रत्येक संघ आपली ताकद लावत आहे. साखळी फेरीत जास्तीत जास्त सामने जिंकत अंतिम फेरी गाठण्याचा मानस आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल स्पर्धेतील आपला दुसरा सामना खेलत आहेत. पण चेन्नईने आपला पहिला सामना गमवला आहे. लखनऊने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. त्यामुळे विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी लखनऊचा प्रयत्न आहे. तर चेन्नई या स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर आहे. पण हा सामना सुरु असताना नेमकी घुसखोरी झाली. ऋतुराज गायकवाड जसा क्रिजमध्ये उतरला तशी कुत्र्याने एन्ट्री मारली.
खरं तर मैदानात कुत्रा घुसण्याची ही काय पहिली वेळ नाही. भारत ऑस्ट्रेलिया सामन्यातही कुत्र्याने अशीच एन्ट्री मारली होती. तेव्हा रवींद्र जडेजासह कर्मचाऱ्यांनी त्याला पळवून लावण्यासाठी प्रयत्न केले होते. पण आता घुसलेल्या कुत्र्याने कर्मचाऱ्यांना चांगला घाम फोडला.पाच सहा कर्मचारी मैदानात कुत्रा पकडण्यासाठी आले पण त्यांना कुत्र्याने चांगलाच चकवा दिला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Man of the match of India vs Australia at Chepauk, Chennai.
ஆட்டநாயகன் ?@ChennaiIPL @CSKFansOfficial Dog at Chepauk Stadium ? pic.twitter.com/VvoP3ZxjPe
— Naveen N (@iamyournaveen) March 23, 2023
Dog interrupted the game for a while at Chepauk. #cskvlsg #CSKvsLSG pic.twitter.com/CiAbmQopII
— rajendra tikyani (@Rspt1503) April 3, 2023
चेन्नईसाठी चेपॉक मैदान खूप खास आहे. टीमने या मैदानात 1426 दिवसानंतर पुनरागमन केलं आहे. या मैदानात चेन्नईने शेवटचा सामना 2019 मध्ये खेळला होता. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर उनाडकडच्या जागेवर यश ठाकुरला संधी दिली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन – केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.
चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन – महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.