MI vs CSK IPL 2023 : अजिंक्य रहाणेची वादळी खेळी आणि चेन्नईचा विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव
आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबईला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन अपयशी ठरले.
मुंबई : मुंबई इंडियन्स संघाने गेल्या सिझनपासून सुरु केलेली पराभवाची मालिका अजूनही सुरुच ठेवली आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाची नोंद केली आहे. मुंबईनं चेन्नईला विजयासाठी 8 गडी बाद 157 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने मुंबईवर 7 गडी आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईच्या गुणतालिकेत दोन गुणांची कमाई केली आहे. तसेच धावगती चांगली असल्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
चेन्नईचा डाव
मुंबई इंडियन्स विजयासाठी दिलेल्या 158 धावांचं आव्हान गाठण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे जोडी मैदानात आली. पण जेसन बेहर्नडॉर्फच्या गोलंदाजीवर खातंही न खोलता कॉनवे बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी केली. त्याने 19 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकलं. तर 27 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. त्यानंतर आलेला शिवम दुबेनं ऋतुराजसोबत चांगली भागीदारी केली. मात्र कार्तिकेयच्या गोलंदाजावीर त्रिफळाचीत झाला. त्याने 26 चेंडूत 28 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
मुंबईचा डाव
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी सलामीला आली. पहिल्याच षटकात दोन चौकार मारत रोहित शर्माने आपला आक्रमक अंदाज दाखवला. रोहित शर्माचं वादळ घोंगावण्यापूर्वी तुषार देशपांडेनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 13 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. पण इशान किशनला रवींद्र जडेजाने रोखलं आणि ड्वेन प्रेटोरियसनं इशान किशान त्याचा झेल घेतला. त्याने 21 चेंडूत 31 धावांची खेळी केली.
सूर्यकुमार यादव मैदानात आला पण हजेरी लावून पुन्हा निघून गेला. त्यानंतर कॅमरून ग्रीन बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेलं घेतला. मिशेल सॅटनरच्या गोलंदाजीवर अर्शद खान एलबीडब्ल्यू झाला. तिलक वर्माही काही खास करू शकला नाही. त्याच्या रुपाने सहावा गडी बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सकडून मुंबईला खूपच अपेक्षा होत्या. पण उंच फटका मारल्यानंतर त्याचा अप्रतिम झेलं सीमारेषेवर घेण्यात आला. टीम डेविडने चांगली फटकेबाजी केली. त्याने 22 चेंडूत 31 धावा केल्या. तुषार देशपांडेने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सीमारेषेवर अजिंक्य रहाणेने त्याचा झेल घेतला.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे