IPL 2023: ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्ज टीम सोबत राहणार, स्विकारली नवी जबाबदारी
चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला दिली नवी जबाबदारी, युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2023) पुढच्या सीजनची आतापासून तयारी सुरु झाली आहे, कोणत्या टीममध्ये कोणते खेळाडू खेळणार याची यादी बीसीसीआयने (BCCI) घेतली आहे. तसेच ज्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, अशा खेळाडूंसाठी हंगामी लिलाव होणार असल्याची माहिती बीसीसीआयने जाहीर केली आहे. विशेष हंगामी लिलावासाठी देशभरातील खेळाडूंना नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देशभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी (Player) आपली नावं तिथं नोंद केली आहेत.
पुढच्या आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्ज या टीमने अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामध्ये ड्वेन ब्राव्होचं सुद्धा नाव होतं. त्यामुळे ड्वेन ब्राव्हो कोणत्या टीममधून खेळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु चेन्नई सुपर किंग्जने त्याला नवी जबाबदारी देऊन टीम सोबत काय ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला गोलंदाजीतील प्रशिक्षक पदं दिलं आहे.
यंदा चेन्नई सुपर किंग्ज या टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सुध्दा चांगला निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. तसेच यापुढे तो बीसीसीआयसोबत कायम असेल अशी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
ड्वेन ब्राव्हो आणि धोनी यांनी आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज टीमला सहावेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे.
संपुर्ण आयपीएल स्पर्धेत पुढच्यावर्षी युवा खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत.