DC vs GT IPL 2023 : गुजरात टायटन्सची विजयी घोडदौड सुरु, दिल्लीवर 6 विकेट्सने विजय

आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली पराभवाची धूळ चारत गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर दिल्लीचा संघ दोन पराभवासह आठव्या स्थानावर आहे. दिल्लीचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत 8 एप्रिलला आहे.

DC vs GT IPL 2023 : गुजरात टायटन्सची विजयी घोडदौड सुरु, दिल्लीवर 6 विकेट्सने विजय
DC vs GT IPL 2023 : गुजरातनं दिल्लीला सहा गडी राखून नमवलं, साई सुदर्शन विजयाचा शिल्पकारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:42 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरातनं सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघावर 6 गडी आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला. साई सुदर्शननं 48 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर डेविड मिलारनं त्याला चांगली साथ दिली. त्याने 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. या विजयासह गुजरात आयपीएल गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा सलग दुसरा पराभव झाल्याने गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे.

गुजरातचा डाव

गुजरातच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेले वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल झटपट बाद झाले. दोघांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला हार्दिक पांड्याही कमाल करू शकला नाही. अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर असलेला विजय शंकर आणि साई सुदर्शन यांनी संघाची बाजू सावरली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर विजय शंकर पायचीत होत बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

दिल्ली कॅपिटल्सनं गुजरातसमोर विजयासाठी 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून सलामीला डेविड वॉ़र्नर आणि पृथ्वी शॉ मैदानात उतरले. मात्र दुसऱ्या सामन्यातही पृथ्वी शॉ फ्लॉप ठरला. 5 चेंडूत अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अलझारीने त्याचा झेल घेतला. त्यानतर मिशेल मार्शही चांगली कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद शमीने त्याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या गड्यासाठी डेविड वॉर्नर आणि सरफराज खान यांनी संघाला सावरणारी पार्टनरशिप केली. पण डेविड वॉर्नर अलझारीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि धावसंख्येवर फरक पडला.

रिली रोसोही खातं न खोलताच तंबूत परतला. अभिषेक पोरेल आमि सरफराज खाननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अभिषेक राशिद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर सरफराज खान 30 धावा करून तंबूत परतला. अक्षर पटेलनं संघाला सावरेल अशी फटकेबाजी केली. मात्र त्याला तशी साथ मिळाली नाही. अमन खान 8 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने शेवटच्या षटकात चांगली फटकेबाजी केली. मात्र 22 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन – पृथ्वी शॉ, डेविड वॉ़र्नर, मि. मार्श, एसएन खान, आरआर रोस्सोव, अमन हकिम खान, एआर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, ए नार्त्झे, मुकेश कुमार

गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन – गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन – वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेविड मिलार, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अलझारी जोसेफ

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.