IPL 2023 स्पर्धा स्थगित होणार? दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ

आयपीएल 2023 स्पर्धा सुरु असताना कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यात दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा 2021 सारखी स्थिती येते की काय असा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करत आहेत.

IPL 2023 स्पर्धा स्थगित होणार? दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ
IPL 2023 स्पर्धा स्थगित होणार? दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 5:11 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुपी राक्षसाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. आता आयपीएल 2023 स्पर्धेवरही कोरोनाचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे आयपीएल 2021 प्रमाणे पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागते की काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. आता माजी खेळाडू, क्रिकेट समालोचक आणि तज्ज्ञ असलेल्या आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: आकाश चोप्रा याने दिली आहे. युट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टवर त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळे काही दिवस आकाश चोप्रा समालोचन करताना दिसणार नाही.

“कॉट अँड बोल्ड कोविड.. हा…सी (कोविड) व्हायरसने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. खूपच साधारण लक्षणं आहे. सर्वकाही नियंत्रणात आहे. काही दिवसांसाठी समालोचनापासून दूर असेन. उत्साहपूर्वक पुनरागमनाची आशा”, असं ट्वीट आकाश चोप्रा याने केलं आहे.

आकाश चोप्राने ऑक्टोबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. शेवटचा सामना ऑक्टोबर 2004 मध्ये खेळला होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आकाशने एकूण 10 कसोटी सामने खेळला आहे. यात फलंदाजी करताना 23 च्या सरासरीने 437 धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएल 2021 दरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लीग मध्येच स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने युएईत खेळवण्यात आले होते. आयपीएल 2023 स्पर्धा आता सुरु असून आतापर्यंत फक्त 6 सामने खेळवले गेले आहेत. कोरोनाचा तसा प्रसार नसल्याने बायोबबल नावाचा प्रकारही नाही. त्यामुळे कोरोनाचं संकट वाढलं तर मात्र चिंता वाढू शकते.

आयपीएल 2023 स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला आहे. सध्या साखळी फेरीचे सामना सुरु असून 21 मे पर्यंत एकूण 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम फेरीचा सामना असेल. प्लेऑफ आणि अंतिम फेरीबाबत अजूनही बीसीसीआयने कोणतीच घोषणा केलेली नाही.

आयपीएल 2023 स्पर्धेतील संघ

मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट राईडर्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनराईजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना

आयपीएल 2023 स्पर्धेतील आज सातवा सामना खेळला जाणार आहे. यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लढत असणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये 7.30 वाजता खेळला जाणार आहे. दिल्लीनं या स्पर्धेतील पहिला सामना गमवला आहे. तर गुजरातनं स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.