DC VS GT IPL 2023 Highlights | गुजरातनं दिल्लीला सहा गडी राखून नमवलं, साई सुदर्शन विजयाचा शिल्पकार

| Updated on: Apr 05, 2023 | 12:34 AM

Delhi Capitals vs Gujarat Titans IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात गुजरात टायटन्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. दिल्लीनं सलग दुसरा सामना गमवल्याने गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.

DC VS GT IPL 2023 Highlights | गुजरातनं दिल्लीला सहा गडी राखून नमवलं, साई सुदर्शन विजयाचा शिल्पकार

दिल्ली | आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरातनं सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघावर 6 गडी आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह गुजरात आयपीएल गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा सलग दुसरा पराभव झाल्याने गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 04 Apr 2023 11:28 PM (IST)

    DC vs GT, IPL 2023 Live Score | गुजरातने दिल्लीला पाजलं पराभवाचं पाणी

    आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरातनं सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघावर 6 गडी आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला.

    गुजरातचा डाव

    गुजरातच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेले वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल झटपट बाद झाले. दोघांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला हार्दिक पांड्याही कमाल करू शकला नाही. अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर असलेला विजय शंकर आणि साई सुदर्शन यांनी संघाची बाजू सावरली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर विजय शंकर पायचीत होत बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. साई सुदर्शननं 48 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर डेविड मिलारनं त्याला चांगली साथ दिली. त्याने 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या.

  • 04 Apr 2023 11:17 PM (IST)

    DC vs GT, IPL 2023 Live Score | साई सुदर्शनची अर्धशतकी खेळी, गुजरातचा डाव सावरण्यात यश

    गुजरातच्या आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याननंतर साई सुदर्शनने सावध खेळी केली. त्याने 44 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

  • 04 Apr 2023 10:10 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | हार्दिक पांड्याच्या रुपाने गुजरातला तिसरा धक्का, दिल्लीचं जबरदस्त कमबॅक

    दिल्लीनं गुजरातसमोर विजयासाठी 163 धावांंचं आव्हान दिलं आहे. या फॉर्मेटमध्ये ही धावसंख्या तशी कमी असल्याने विकेट्स खूप महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला दोन झटके दिल्यानंतर हार्दिक पांड्याही अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे गुजरातवर दबाव वाढला आहे.

  • 04 Apr 2023 10:02 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | गुजरातचे दोन गडी स्वस्तात बाद, गिल 14 धावांवर त्रिफळाचीत

    गुजरातचे दोन गोलंदाज झटपट बाद झाले. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल प्रत्येकी 14 धावा करून तंबूत परतले.

  • 04 Apr 2023 09:24 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सचं गुजरातसमोर विजयासाठी 163 धावांच आव्हान

    दिल्ली कॅपिटल्सचा डाव

    दिल्ली कॅपिटल्सनं गुजरातसमोर विजयासाठी 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून सलामीला डेविड वॉ़र्नर आणि पृथ्वी शॉ मैदानात उतरले. मात्र दुसऱ्या सामन्यातही पृथ्वी शॉ फ्लॉप ठरला. 5 चेंडूत अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अलझारीने त्याचा झेल घेतला. त्यानतर मिशेल मार्शही चांगली कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद शमीने त्याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या गड्यासाठी डेविड वॉर्नर आणि सरफराज खान यांनी संघाला सावरणारी पार्टनरशिप केली. पण डेविड वॉर्नर अलझारीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि धावसंख्येवर फरक पडला. रिली रोसोही खातं न खोलताच तंबूत परतला. अभिषेक पोरेल आमि सरफराज खाननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अभिषेक राशिद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर सरफराज खान 30 धावा करून तंबूत परतला. अक्षर पटेलनं संघाला सावरेल अशी फटकेबाजी केली. मात्र त्याला तशी साथ मिळाली नाही. अमन खान 8 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने शेवटच्या षटकात चांगली फटकेबाजी केली. मात्र 22 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.

  • 04 Apr 2023 09:08 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | सरफाज खान 30 धावा करून तंबूत परतला, दिल्लीची मोठ्या धावसंख्येसाठी धडपड

  • 04 Apr 2023 08:21 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | डेविड वॉर्नरनंतर रुसोच्या रुपाने दिल्लीला चौथा झटका

  • 04 Apr 2023 08:18 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सला डेविड वॉर्नरच्या रुपाने तिसरा धक्का

  • 04 Apr 2023 07:59 PM (IST)

    मोहम्मद शमीने दुसरी विकेट घेतली असून त्याने मिचेल मार्शला 4 धावांवर बाद केलं आहे.

  • 04 Apr 2023 07:47 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, पृथ्वी शॉ 7 धावा करून बाद

  • 04 Apr 2023 07:39 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात

    दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही सलामी जोडी मैदानात आहे.  गुजरात टायटन्सने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

  • 04 Apr 2023 07:27 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | अभिषेक पोरेल दिल्ली संघातून करणार पदार्पण

    दिल्ली कॅपिटल्स संघातून अभिषेक पोरेल पहिल्यांदाच पदार्पण करणार आहे. त्यामुळे तो कसा खेळतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

  • 04 Apr 2023 07:20 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन

    दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन – पृथ्वी शॉ, डेविड वॉ़र्नर, मि. मार्श, एसएन खान, आरआर रोस्सोव, अमन हकिम खान, एआर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, ए नार्त्झे, मुकेश कुमार

  • 04 Apr 2023 07:17 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

    गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन – वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेविड मिलार, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अलझारी जोसेफ

  • 04 Apr 2023 07:02 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, हार्दिकचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    दिल्ली विरुद्धच्या सामन्यात गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 04 Apr 2023 06:15 PM (IST)

    DC VS GT IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासाठी आतुर

    दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयासाठी दिल्लीचा संघ उत्सुक असेल. तर गुजरात आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यावर भर असेल.

Published On - Apr 04,2023 6:10 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.