LSG vs SRH IPL 2023 | आयपीएल गुणतालिकेत लखनऊची पहिल्या स्थानी झेप, दोन गुणांसह रनरेटमध्ये पडला इतका फरक

आयपील 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सनं हैदराबादला पराभूत करत दोन गुणांची कमाई केली आहे. आयपीएल गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

LSG vs SRH IPL 2023  | आयपीएल गुणतालिकेत लखनऊची पहिल्या स्थानी झेप, दोन गुणांसह रनरेटमध्ये पडला इतका फरक
राजस्थाननंतर लखनऊने हैदराबादला दिला दणका, आयपीएल 2022 सारखीच स्थिती Image Credit source: BCCI Twitter
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 11:20 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत हैदराबादची स्थिती मागच्या सिझनसारखी झाली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उणीव दिसून येत आहे. मागचा हंगाम हैदराबादसाठी असाच काहीसा होता. 14 पैकी फक्त 6 सामन्यात विजय मिळवता आला होता. स्पर्धा संपली तेव्हा संघाला 8 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर चेन्नई आणि मुंबईचा संघ होता. या स्पर्धेतही हैदराबादची स्थिती तशीच असल्याचं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. सलग दोन पराभवामुळे हैदराबादचे चाहते नाराज झाले आहेत.

दुसरीकडे हैदराबादला पराभूत करत लखनऊचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे 4 गुण झाले असून +1.358 इतकी धावगती झाली आहे. हैदराबादचा संघ सलग दोन पराभवासह -2.867 रनरेटसह सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. हैदराबाद विरुद्धचा सामना लखनऊ सुपर जायंट्सने 7 गडी आणि चेंडू राखून जिंकला. हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमवून 121 धावा केल्या होत्या. हे आव्हान लखनऊनं 16 षटकात पूर्ण केलं.

लखनऊचा डाव

कायल मेयर्स आणि केएल राहुल जोडीने चांगली सुरुवात केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 35 धावांची खेळी केली. त्यानंतर कायल मेयर्स 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कृणाल पांड्या मैदानात उतरला आणि आक्रमक खेळी करत 23 चेंडूत 34 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर अनमोलप्रीत सिंगने त्याचा झेल घेतला.

विजयाच्या उंबरठ्यावर असताना केएल राहुल चुकीचा फटका मारून बाद झाला. अदिल राशीदच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर आलेला रोमारियो शेफर्ड पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही

हैदराबादचा डाव

हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा धाडसी निर्णय असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली होती. सलामीला अनमोलप्रीत सिंग आणि मयंक अग्रवाल जोडी मैदानात उतरली. पण संघाच्या 21 धावा असताना मयंक अग्रवालच्या रुपाने पहिला धक्का बसला. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारत झेलबाद झाला. मार्कस स्टोइनिसने झेल पकडण्याची कोणतीही संधी सोडली नाही.

दुसऱ्या गड्यासाठी अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठीने सावध खेळी केली. पण कृणाल पांड्याने त्याला एलबीडब्ल्यू करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला एडन मार्करामही काही खास करू शकला नाही. कृणाल पांड्याने त्याचा त्रिफळा उडवत शून्यावर तंबूत पाठवलं. त्यानंतर आलेल हॅरी ब्रूक 4 चेंडूत 3 धावा करून रवि बिष्णोईच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला.

राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. मैदानात तग धरून राहिला खरा पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. यश ठाकुरच्या गोलंदाजीवर अमित मिश्राने त्याचा झेल घेतला. त्याने 41 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. उमरान मलिकच्या रुपाने हैदराबादला आठवा धक्का बसला आहे. एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन)- केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन) – मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल रशीद

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.