IPL 2023 : आरसीबीला पराभूत केल्यानंतर लखनऊच्या आवेश खानचा विजयी उन्माद, नेमकं काय केलं पाहा Video
आयपील 2023 स्पर्धेत खेळाडूंचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. लखनऊ विरुद्ध बंगळुरू सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. वेगवान गोलंदाज आवेश खानच्या कृतीमुळे सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. गेल्या दोन सामन्यात क्रीडा रसिकांचं चांगलंच मनोरंजन झालं. गुजरात विरुद्ध कोलकात्या सामन्यानंतर लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यात अतितटीची लढाई पाहायला मिळाली. लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर शेवटच्या चेंडूवर एक गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर शेवटच्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या आवेश खाननं हेल्मेट हवेत उडवलं आणि जमिनीवर जोरदार आपटलं. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 2 गडी गमवत 212 धावा केल्या. हे आव्हान लखनऊने 20 षटकात 9 गडी गमवून पूर्ण केलं.
आवेश खान आणि रवि बिष्णोई यांनी शेवटच्या चेंडूवर लेग बाइज धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर आवेश खाननं आपला विजयी जल्लोष केला. इतकंच काय हेल्मेट जोराने जमीनीवर आपटलं. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी दंड ठोठावला आहे. इतकं काय तर त्याला इशारा देखील दिला आहे.
????. ?. ???? ???@LucknowIPL pull off a last-ball win!
A roller-coaster of emotions in Bengaluru ??
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/96XwaYaOqT
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
आयपीएल प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलं आहे की, “लखनऊ जायंट्सच्या आवेश खानवर आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. आवेश खानने आयपीएल आचार संहितेचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं आहे.” आचार संहितेच्या लेव्हल 1 प्रकरणात सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो.
लखनऊचे पहिले चार गडी झटपट बाद झाल्यानंतर मार्कस स्टोईनिस आणि निकोलस पूरनने सामना फिरवला. त्यानंतर आलेला इम्पॅक्ट प्लेयर आयुश बदोनीने 24 चेंडूत 30 धावा केल्या. मात्र जयदेव उनाडकट आमि मार्क वूड स्वस्तात बाद झाल्याने सर्व भार रवि बिष्णोई आणि आवेश खान यांच्यावर आला.
शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना हर्षल पटेलने जबरदस्त चेंडू टाकला. पण बायवर धाव घेत आवेश खानने एक रन पूर्ण केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने विजयी जल्लोक केला. या विजयानंतर लखनऊचा संघ गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर बंगळुरुची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.