IPL 2023 | नवे आहेत पण छावे आहेत, हे 10 खेळाडू डेब्यूतच करणार कारनामा, एक तर गेलपेक्षा डेंजर
आयपीएल 2023 स्पर्धा काही खेळाडूंसाठी शेवटची काही खेळाडूंसाठी पहिली ठरणार आहे. या स्पर्धेत काही नवखे जबरदस्त कामगिरी करतील अशी आशा आहे. त्यांचा मागचा रेकॉर्ड पाहता असंच म्हणावं लागेल.
मुंबई – आयपीएल स्पर्धा ही जगातील श्रीमंत लीगपैकी एक आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू उत्सुक असतात. पण कोणता खेळाडू कधी कसा बाजी पालटेल सांगता येत नाही. आयपीएल 2023 स्पर्धा कोणता खेळाडू गाजवणार, हे आता सांगणं तरी कठीण आहे. मात्र काही खेळाडूंची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे काही खेळाडू पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळणार आहे. फर्स्ट क्लास आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूंना आपल्या खेळाची छाप सोडली आहे. यंदा 10 युवा खेळाडू असे आहेत की, आपल्या कतृत्वाची छाप सोडू शकतात.
कॅमरून ग्रीन हा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटी खर्च करून संघात घेतलंय. त्याचा स्ट्राईक रेट ख्रिस गेलपेक्षा भारी आहे. त्याने 173 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तर ख्रिस गेलचा आयपीएलमधील स्ट्राईक रेट 143 आहे. ग्रीनने आतापर्यंत 8 टी 20 सामने खेळले आहेत आणि 139 धावा केल्या आहेत.
24 वर्षीय हॅरी ब्रूक हा इंग्लंडचा खेळाडू सनराईजर्स हैदराबादकडून खेळत आहे. हैदराबादनं 13.20 कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात घेतलं आहे. सध्या तो चांगलाच फॉर्मात आहे. त्याने 148.38 च्या सरासरीने 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच मध्यम गतीने गोलंदाजीही करतो.
फिन एलेन हा न्यूझीलँडचा खेळाडू विराटसोबत मैदानात उतरेल. टी 20 वर्ल्डकमध्ये त्याला पहिल्यांदा संधी मिळाली होती. त्याचा स्ट्राईक रेट जबरदस्त असून 28 टी 20 सामन्यात 160.41 च्या सरासरीने 616 धावा केल्या आहेत.
नूर अहमद हा अफगाणिस्तानचा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. गुजरातने 30 लाख बेस प्राईसवर त्याला संघात घेतलं आहे. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये त्याने 6 सामन्यात त्याने 3.81 च्या इकोनॉमी रेटने 10 गडी बाद केले आहेत. तो प्रत्येक 23 व्या चेंडूवर गडी बाद करतो.
विव्रांत शर्मासाठी आरसीबी आणि हैदराबादमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळली. अखेर हैदाराबादनं 2.60 कोटी खर्च करून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. त्याने घरच्या मैदानात क्रिकेट खेळताना 786 धावा आणि 15 गडी बाद केले आहेत. टी 20 च्या 9 सामन्यात त्याने 6 गडी बाद केले.
जोशुआ लिटिल हा आयर्लंडचा खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये पहिली हॅटट्रीक घेतली होती. गुजरातने त्याला 4.40 कोटी खर्च करत संघात स्थान दिलं आहे. त्याने 53 टी 20 सामन्यात 62 गडी बाद केले आहेत. तो प्रत्येक 17 व्या चेंडूवर एक गडी बाद करतो अशी आकडेवारी आहे.
फझल हक फारुकी या अफगाणिस्तानच्या गोलंदाजाला हैदराबादनं 50 लाख रुपये खर्च करत संघात घेतलंय. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 50 हून अधिक गडी बाद केले आहेत. आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये 7 पेक्षा कमी इकोनॉमीने धावा दिल्या आहेत.
सिंकदर राजा हा झिम्बाब्वेचा खेळाडू पंजाब किंग्सने 50 लाखात आपल्या संघात घेतला आहे. दोन वर्षांपासून वनडे आणि टी 20 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. 168 टी 20 मध्ये त्याने 132.11 च्या स्ट्राईक रेटने 3320 धावा केल्या आहेत. तसेच 7.38 च्या इकोनॉमीने 87 गडी बाद केले आहेत.
24 वर्षीय यश ठाकुर याचीही जोरदार चर्चा आहे. लखनऊ सुपरजायन्ट्सनं 45 लाख रुपयात आपल्या संघात घेतलं आहे. मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत त्याने 10 सामन्यात 15 गडी बाद केले आहेत. खासकरून डेथ ओव्हरमध्ये त्याचं प्रदर्शन चांगलं आहे.
फिलीप सॉल्ट आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. ऋषभ पंतची जागी तो चांगली कामगिरी करू शकतो. सॉल्टने 177 टी 20 खेळले आहेत. 150.51 च्या स्ट्राईक रेटने 4055 धावा केल्या आहेत. त्याने टी 20 कारकिर्दीत 135 षटकार ठोकले आहेत.