IPL 2023 : पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता ‘नाईट’ राइडर्स सामन्यात बिघाड, काय झालं नेमकं वाचा
आयपीएल 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात एकच गोंधळ उडाला. बऱ्याच वेळ प्रश्न जैसे थे राहिल्याने वैतागून शिखर धवनने सर्व खेळाडूंना डगआउटमध्ये बोलवलं.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात रंगला. कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबनं 20 षटकात 5 गडी गमवून 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. मात्र दुसऱ्या डावात कोलकात्याचं संघ फलंदाजीसाठी येणार तितक्यात गडबड झाली. मोहालीच्या मैदानातील लाईट्स सुरु झाल्याच नाहीत त्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला. पंजाब किंग्सचे खेळाडू मैदानात बऱ्याच वेळ थांबल्यानंतर कर्णधार शिखर धवननं खेळाडूंना डगआउटमध्ये बोलवलं.
मैदानातील कर्मचाऱ्यांनी 20 मिनिटं अथक प्रयत्न केल्यानंतर लाईट सुरु केली. त्यानंतर पहिला डाव सुरु झाला. यामुळे थोडा वेळ का होईना नाचक्की झाली. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. कोलकाता नाईट राइडर्सनेही शाहरुखच्या ‘रब ने बना दि जोडी’ चित्रपटामधील सीन शेअर करत फिरकी घेतली.
Flood Lights are out and we're calling in the big guns for help! ? pic.twitter.com/chhAsqywp5
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2023
Game delayed due to technical issues!
Stay tuned, #SherSquad! We'll be right back! #PBKSvKKR #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 1, 2023
तांत्रिक अडचणीमुळे आयपीएल सामन्यात थांबवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2022 मध्ये मुंबई आणि चेन्नई विरुद्धच्या सामन्यात डीआरएस सिस्टम बंद झाली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
दोन्ही संघातील परदेशी खेळाडू
दरम्यान पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू आहेत. कोलकातामध्ये सुनील नरेन, आंद्रे रसेल, टीम साऊथी आणि रहमानुल्लाह गुरबाज हे आहेत. तर पंजाब किंग्समध्ये भानुरा राजपक्षे, सॅम करण, नॅथन एलिस आणि सिंकदर रझा या चौघांचा समावेश आहे.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन, नॅथन एलिस, हरप्रीत ब्ररार, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, मनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टीम साउथी, अनुकूल रॉय, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.