IPL 2023 Retention: आज संपणार डेडलाइन, जाणून घ्या कोणते खेळाडू होणार बाहेर ?
आयपीएलची आतापासून तयारी सुरु झाली आहे.
मुंबई : 2023 च्या आयपीएलची (IPL 2023) आतापासून चर्चा सुरु झाली आहे. कारण जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात, विशेष म्हणजे त्यांची कामगिरी सुद्धा चांगली राहिलेली आहे. जगभरातील क्रिकेटचे चाहते (Cricket Fan) आयपीएलचा आनंद घेतात. कोणते खेळाडू टीममध्ये राहणार आणि कोणते खेळाडू बाहेर पडणार याची अंतिम तारिख आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या टीममधून (Team) खेळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
आयपीएलची आतापासून तयारी सुरु झाली आहे. आज कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये असेल, हे सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. आयपीएलने टीम मालकांना आज शेवटची तारिख दिली आहे. 23 डिसेंबरला कोचीमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. तसेच प्रत्येक फ्रँचायझीला यंदाच्या वर्षी पाच कोटी रुपये अधिक खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चेन्नई सपुर किंग्स या खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता आहे
एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि दीपक चहर
या खेळाडूंना सोडण्याची शक्यता (संभाव्य): ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, नारायण जगदीशन, मिचेल सँटनर.
मुंबई इंडियन्स या खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता आहे
रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा
या खेळाडूंना सोडण्याची शक्यता – फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, टिमल मिल्स, मयंक मार्कंडे, हृतिक शोकिन.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता आहे
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, रजत पाटीदार
या खेळाडूंना सोडण्याची शक्यता (संभाव्य): सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, आकाश दीप
गुजरात टाइटंस या खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता आहे
: हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, रशीद खान, मोहम्मद शमी, राहुल तेवतिया.
या खेळाडूंना सोडण्याची शक्यता (संभाव्य) : मॅथ्यू वेड, विजय शंकर, गुरकीरत मान सिंग, जयंत यादव, प्रदीप संगवान, नूर अहमद, साई किशोर, वरुण आरोन
दिल्ली कॅपिटल्स या खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता आहे
ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, मिचेल मार्श, सरफराज खान, अॅनरिक नोरखिया, कुलदीप यादव
या खेळाडूंना सोडण्याची शक्यता (संभाव्य): शार्दुल ठाकूर, टिम सेफर्ट, केएस भरत, मनदीप सिंग, अश्विन हेबर