DC vs MI IPL 2023 : मुंबई आणि दिल्ली संघात आता विजयाचं खातं कोण खोलणार? प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घ्या

आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वात सुमार कामगिरी असलेल्या दोन संघ आमनेसामने येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघ विजयासाठी आतुर आहेत.

DC vs MI IPL 2023 : मुंबई आणि दिल्ली संघात आता विजयाचं खातं कोण खोलणार? प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घ्या
DC vs MI IPL : मुंबई आणि दिल्ली संघात आता विजयाचं खातं कोण खोलणार? प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 8:08 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघाला अजून विजयी खातं खोलता आलं नाही. आता दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मुंबई आणि दिल्ली आतापर्यंत एकमेकांसमोर 32 उभे ठाकले आहेत. यात मुंबई 17 सामने तर दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत. दोन्ही पहिला सामना 2008 मध्ये खेळला होता. तेव्हा दिल्लीने मुंबईला 5 विकेट्सने पराभूत केलं होतं. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबईने बाजी मारली होती.

आयपीएल 2023 गुणतालिकेत दोन्ही संघ तळाशी आहेत. मुंबई इंडियन्स नवव्या तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या स्थानावर आहे. मुंबईने आतापर्यंत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर दिल्लीच्या वाटेला अजूनही उपेक्षाच आली आहे. असं असलं तरी या हंगामात मुंबईच्या फलंदाजांना अजूनही सूर गवसताना दिसत नाही. मुंबई विरुद्धचा पहिला सामना बंगळुरुने 8 गडी आमि 22 चेंडू राखून जिंकला. तर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात 7 गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला.

दिल्लीने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात लखनऊने 50 धावांनी, दुसऱ्या साम्यात गुजरातने 7 गडी राखून आणि तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 57 धावांनी विजय मिळवला.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स – डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट (विकेटकीपर), मनिष पांडे, रोवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिच नोर्तजे, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, जोफ्रा आर्चर, आर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

दोन्ही संघाचे संपूर्ण स्क्वॉड

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

ठिकाणी – अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली वेळ – 11 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.