IPL 2023 : गुजरात विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला ओव्हर का नाही दिली? डेविड वॉर्नरचं उत्तर ऐकून डोक्यावर हात माराल
दिल्ली कॅपिटल्स संंघाची आयपीएल 2023 स्पर्धेतील सुरुवात एकदम खराब झाली आहे. लखनऊ आणि गुजरात विरुद्ध सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे पुढची स्पर्धा आणखी कठीण असणार आहे.
नवी दिल्ली – आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगात येऊ लागली आहे. विजय पराभवाची मालिका सुरु झाली असून आता अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघ जोर लावत आहे. काही संघांनी स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. तर काही संघ अजूनही विजयासाठी आतुर आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाने स्पर्धेतील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे दबाव वाढत चालला आहे. तसेच डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्याने घेतलेल्या निर्णयावर क्रीडाप्रेमींकडून टीका होत आहे. संघात अक्षर पटेल असताना त्याला एकही षटक न देणं क्रीडाप्रेमींना रुचलेलं नाही.
भारतीय क्रिकेट संघात अक्षर पटेलची ओळख एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे. भारतीय संघात त्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नरला अजूनही त्याची क्षमता कळलेली नाही. अक्षर पटेलला गोलंदाजी न दिल्यानेच दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव झाल्याची चर्चा आहे.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलनं चांगली फलंदाजी केली. पण जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हा डेविड वॉर्नरने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. डेविड वॉर्नरला याबाबत विचारलं असता त्यानं याबाबत आपली भूमिका मांडली.
?? at #QilaKotla ft. Axar Patel#YehHaiNayiDilli #DCvGT #IPL2023 @akshar2026 pic.twitter.com/eIUOTteM6o
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 4, 2023
“अक्षर पटेलला ओव्हर न देण्यामागचं कारण म्हणजे सामन्याची तेव्हाची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय होता. मला वाटलं की कुलदीप आणि मिशेल मार्श त्याच्यापेक्षा प्रभावी असतील.”, असं उत्तर डेविड वॉर्नरनं दिलं.
अक्षर पटेलनं लखनऊ विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 षटकं टाकली होती. चार षटकात 38 धावा देत 1 गडी बाद केला होता. तर फलंदाजी करताना 11 चेंडूत धावा केल्या. यात एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. गुजरात विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलनं 22 चेंडूत 36 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र षटक काही दिलं नाही.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सची सर्वोत्तम Playing XI: डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, मिचेल मार्श, सरफराज खान, अक्षर पटेल, ललित यादव, एनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार, कुलदीप यादव, चेतन सकारिया.
दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.