IPL 2023 : पाचव्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान येणार संपुष्टात ? कसं आहे गुणतालिकेतील गणित जाणून घ्या

आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी सुमार राहिली आहे. पहिल्या चार पैकी चार सामन्यात पराभवाची नोंद केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी पाचवा सामना जिंकावा लागेल.

IPL 2023 : पाचव्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान येणार संपुष्टात ? कसं आहे गुणतालिकेतील गणित जाणून घ्या
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबी विरुद्धचा सामना करो या मरोचा! पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान येणार संपुष्टात?
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 7:30 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळणार आहे. आता चौथ्या फेरीचा टप्पा सुरु आहे. दिल्ली, लखनऊ, राजस्थान आणि चेन्नईने प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. लखनऊ, राजस्थान आणि चेन्नईची स्पर्धेतील स्थिती चांगली आहे. दिल्लीनं आतापर्यंत खेळलेले चारही सामने गमावले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेत राहण्यासाठी पुढचे दहापैकी आठ सामने जिंकावं लागणार आहे. आता दिल्लीचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी आहे. त्यामुळे या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान कठीण होईल. कारण दिल्लीचा संघ सोडला तर इतर संघानी आतापर्यंत 6 ते 4 गुणांची कमाई केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं तीन पैकी दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे चौथा सामन्यात जिंकून आव्हान कायम ठेवण्याचा मानस असेल. दुसरीकडे दिल्लीसाठी हा सामना करो या मरोसारखाच असणार आहे. सलग पाच पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान कायम ठेवणं कठीण होईल. त्याचबरोबर धावगतीही उणे स्थितीत असल्याने आणखी फटका बसेल. त्यामुळे हा सामना दिल्लीला काहीही करून जिंकावाच लागेल.

दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनऊने 50 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात गुजरातने 6 गडी आणि 11 चेंडू राखून पराभवाची धूळ चारली. तिसऱ्या सामन्यात राजस्थानने 57 धावांनी, तर चौथ्या सामन्यात मुंबईने 6 गडी राखून पराभूत केलं.

बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबईला 8 गडी आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याने 81 धावांनी, तर लखनऊने 1 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे चौथा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 27 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापीकी बंगळुरुने 16 आणि दिल्लीने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.