IPL 2025: बाबा बनल्यावर केएल राहुलचं मैदानावर पुनरागमन, या दिवशी खेळणार मॅच
केएल राहुल याला दिल्ली कॅपिटल्सने मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु या सीझनला सुरूवात झाल्यानंतर, पहिल्या मॅचमध्येच तो खेलला नाही. दिल्लीच्या पहिल्या सामन्याच्या दिवशी म्हणजेच 24 मार्च रोजी राहुलची पत्नी अथिया शेट्टीने एका मुलीला जन्म दिला आणि याच क्षणासाठी राहुलला संघातून सुट्टी देण्यात आली.

इंडियन प्रीमिअर लीगचा नवा सीझन नुकताच सुरू झाला असून अनेक खेळाडूंसाठी तो खास ठरत आहे. भारताचा स्टार खेळाडू, फलंदाज के.एल.राहुल हाही त्यापैकीच एक आहे. या सीझनच्या सुरूवातीलाच त्याल एक छान, गोड खुशखबरी मिळाली. पण राहुलची ही शानदार सुरुवात मैदानात नव्हे तर तर मैदानाबाहेर झाली कारण टूर्नामेंट सुरू होताच त्याला, त्याच्या लेकीच्या जन्माची गोड बातमी मिळाली. तो पहिल्यांदाच पिता बनला आहे. के.एल राहुलची पत्नी., अभिनेत्री अथिय शेट्टीने नुकताच मुलीला जन्म दिलाा. या सुंदर सुरुवातीनंतर, आता राहुल मैदानावर चमत्कार करण्यासाठी सज्ज झाला असून तो लवकरच दिल्ली कॅपिटल्ससाठी पुनरागमन करणार आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू के.ए.राहुल हा 24 मार्च रोजी पिता झाला. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने एका मुलीला जन्म दिला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याचं हे पहिलंच अपत्य आहे. अशा परिस्थितीत, गुड न्यूजच्या वेळेस, या खास प्रसंगी राहुलला पत्नीसोबत राहायचे होते. यामुळे त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या सामन्यातून सुट्टी देण्यात आली होती. दिल्ली कॅपिटल्सने सोमवार, 24 मार्च रोजी पहिला सामना खेळला, तर राहुल त्याच्या एक दिवस आधी घरी परतला होता.
दुसऱ्या मॅचमधून करणार पुनरागमन
आता पत्नी आणि लहान लेकीसोबत काही वेळ घालवल्यानंतर राहुल पुन्हा मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला राहुल दिल्ली कॅपिटल्सच्या दुसऱ्या सामन्यातून परतणार आहे. दिल्लीचा पुढचा सामना ३० मार्चला विशाखापट्टणमला होणार आहे. यावेळी संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे, त्यांनी पहिल्याच सामन्यात शानदार विजय नोंदवला होता. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्लीनेही आपला पहिला सामना रोमहर्षक पद्धतीने जिंकला. पण दुसरा सामना त्यांच्यासाठी पहिल्या सामन्यापेक्षा अधिक आव्हानात्मक ठरेल आणि अशा स्थितीत राहुलच्या पुनरागमनामुळे संघाची ताकद वाढू शकते.
नव्या टीमसाठी करणार कमाल ?
आतापर्यंत, आयपीएल 2025 ची सुरुवात काही खेळाडूंसाठी जोरदार झाली आहे ज्यांनी गेल्या हंगामानंतर आपला संघ बदलला. श्रेयस अय्यर, आशुतोष शर्मा, कृणाल पंड्या, इशान किशन या खेळाडूंनी आपापल्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करून छाप सोडली आहे. यावेळी केएल राहुल देखील नवीन संघाचा एक भाग आहे. गेल्या 3 हंगामात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केल्यानंतर राहुल यावेळी दिल्लीच्या टीममध्ये दाखल झाला आहे. दिल्लीच्या टीमे मेगा ऑक्शनमध्ये के.एल.राहुल याला14 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता राहुललाही इतर खेळाडूंप्रमाणे नव्या मोसमाची दमदार सुरुवात करायला आवडेल. त्याचा परफॉर्मन्स कसा असेल हे लवकरच समजेल.