बायकोही सोबत नको…, IPLमध्ये टीम इंडियासारखेच कडक नियम, दुसरा नियम सर्वात खतरनाक
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने नुकतेच भारतीय टीमवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOPs) चे नियम लागू केले होते, तसेच काही नियम आयपीएल 2025 मध्येही दिसतील. ज्यामुळे खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नियम आणखीनच कडक झाले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियासाठी अनेक कठोर नियम केले होते. भारतीय संघावर लागू करण्यात आलेले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ((SOPs) काही नियम IPL 2025 मध्ये देखील दिसतील. आयपीलएच्या नव्या सीझनला आज सुरूवात होणार आहे. बीसीसआयतर्फे या नियमांची माहिती सर्व 10 संघांना आधीच देण्यात आली होती. या नियमांचा परिणाम सर्व संघांच्या ट्रेनिंग कँपमध्येही दिसून आला. आयपीएलचे हे नवीन नियम खेळाडूंच्या प्रवासापासून ते कुटुंबातील सदस्य यापर्यंत विस्तारले आहेत.
IPL मध्ये टीम इंडिया प्रमाणेच कडक नियम
यावेळी आयपीएल दरम्यान, केवळ अधिकृत व्यक्तींनाच मैदानावर जाण्याची आणि ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार आहे. याचा अर्थ असा की आयपीएलची मॅच सुरू असताना कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबातील सदस्य मैदानात येऊ शकत नाहीत आणि त्यांना ड्रेसिंग रूममध्ये प्रवेशही मिळणार नाही. एवढंच नव्हे तर ज्या दिवशी सरवा किंवा प्रॅक्टिस सुरू असेल त्यादिवशीही ड्रेसिंग रूममध्ये कुटुंबीयांना प्रवेश मिळणार नाही. बीसीसीआयने आयपीएल सामन्यांच्या आधी आणि मॅचदरम्यानही खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांच्या परिसरात (PMOA) कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीबाबतचे नियम कडक केले आहेत.
सर्व खेळाडू बसनेच प्रवास करणार
तसेच सर्व खेळाडूंनी सरावासाठी येताना टीम बसचा वापर करणे आवश्यक आहे. म्हणजे कोणताही खेळाडू स्वत:च्या गाडीतून सरावासाठी येणार नाही. मात्र, संघ दोन गटात प्रवास करू शकतात. पण खेळाडूचे कुटुंबातील सदस्य आणि मित्र वेगळ्या वाहनाने प्रवास करू शकतात आणि हॉस्पिटॅलिटी झोनमधून संघाचा सराव पाहू शकतात. यापूर्वी, खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना संघ बसमध्ये एकत्र प्रवास करता येत होता. मात्र आता तसे करता येणार नाही.
थ्रो डाउन स्पेशालिस्ट आणि नेट बॉलरसाठी नवे नियम
यावेळी बीसीसीआयने आयपीएलमधील थ्रो डाउन स्पेशालिस्ट आणि नेट बॉलर्सच्या नियमातही बदल केला आहे. सर्व संघांना अतिरिक्त सपोर्ट स्टाफ जसे की थ्रो डाउन स्पेशलिस्ट आणि नेट बॉलर्सची यादी बीसीसीआयकडे मंजुरीसाठी सादर करावी लागेल. मंजुरी मिळाल्यानंतर, नॉन-मॅच डे ॲक्रिडेशन जारी केले जाईल. यापूर्वी असे घडले नव्हते. संघ त्यांच्या संघात कोणत्याही खेळाडूला नेट बॉलर म्हणून समाविष्ट करत असत. तसेच, खेळाड हे त्यांचे ॲक्रिडेशन कार्ड सामन्याच्या ठिकाणी आणण्यास विसरल्यास, त्यांना दंड आकारला जाईल. सामना संपल्यानंतर सादरीकरणादरम्यानही सैल आणि स्लीव्हलेस कपडे घालण्याची परवानगी नाही.