आयपीएल लिलाव : दिग्गजांना मागे टाकत हे नवखे खेळाडू करोडपती बनले!
जयपूर : आगामी आयपीएल मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडलाय. जयदेव उनाडकट आणि वरुण चक्रवर्ती हे दोघे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटवर, तर किंग्ज इलेव्हन पंजाबने वरुण चक्रवर्तीवर प्रत्येकी 8.40 कोटी रुपयांची बोली लावली. इंग्लंडचा सॅम करन हा सर्वात महागडा दुसरा खेळाडू ठरला, ज्याच्यावर पंजाबने 7.20 कोटी रुपयांची बोली लावली. फ्रँचायझींनी 351 […]
जयपूर : आगामी आयपीएल मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडलाय. जयदेव उनाडकट आणि वरुण चक्रवर्ती हे दोघे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटवर, तर किंग्ज इलेव्हन पंजाबने वरुण चक्रवर्तीवर प्रत्येकी 8.40 कोटी रुपयांची बोली लावली. इंग्लंडचा सॅम करन हा सर्वात महागडा दुसरा खेळाडू ठरला, ज्याच्यावर पंजाबने 7.20 कोटी रुपयांची बोली लावली.
फ्रँचायझींनी 351 पैकी 70 खेळाडूंवर बोली लावली, ज्यात 20 परदेशी खेळाडू आहेत. युवराज सिंह मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल, तर लसिथ मलिंगाचंही मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झालंय. गेल्या मोसमातही जयदेव उनाडकटवर मोठी बोली लागली होती. यावर्षी पुन्हा एकदा तो मालामाल झालाय.
युवराज सिंह मुंबईत
सिक्सर किंग युवराज सिंहच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई इंडियन्सने युवीला बेस प्राईस एक कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात युवराजवर कुणीही बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. पण मुंबई इंडियन्सने त्याला नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे युवी आता मुंबईकडून खेळताना दिसेल. वाचा – आयपीएलमध्ये युवराज सिंहला अखेर खरेदीदार मिळाला!
कोणत्या संघात कुणाचा समावेश?
चेन्नई सुपर किंग्ज :
मोहित शर्मा – 5 कोटी
ऋतुराज गायकवाड – 20 लाख
दिल्ली कॅपिटल्स
कुलिन इंग्राम – 6.40 कोटी
अक्षर पटेल – 5 कोटी
हनुमा विहारी – 2 कोटी
शेरफाने रुदरफोर्ड – 2 कोटी
इशांत शर्मा – 1.10 कोटी
कीमो पॉल – 50 लाख
जलाज सक्सेना – 20 लाख
अंकुश बैन्स – 20 लाख
नाथू सिंग – 20 लाख
बंडारु अय्यप्पा – 20 लाख
किंग्ज इलेव्हन पंजाब
वरुण चक्रवर्ती 8.40 कोटी
सॅम करन – 7.20 कोटी
मोहम्मद शमी – 4.80 कोटी
प्रभसिम्रन सिंग – 4.80 कोटी
निकोलस पूरन 4.20 कोटी
मोईसेस हेनरिक्स – 1 कोटी
हर्दुस विलजोईन – 75 लाख
दर्शन नळकांडे – 30 लाख
सरफराज खान – 25 लाख
अर्शदीप सिंग – 20 लाख
अग्निवेश आयाची – 20 लाख
हरप्रीत ब्रार – 20 लाख
एम. अश्विन – 20 लाख
कोलकाता नाईट रायडर्स
कार्लोस ब्रेथवेट 5 कोटी
लॉकी फर्ग्युसन – 1.60 कोटी
ज्यो डेन्ली – 1 कोटी
हॅरी गर्ने – 75 लाख
निखिल शंकर नाईक – 20 लाख
श्रीकांत मुंढे – 20 लाख
पृथ्वीराज यारा – 20 लाख
अनरिज नॉर्टजे – 20 लाख
मुंबई इंडियन्स
बरिंदर सिंग सरन – 3.40 कोटी
लासिथ मलिंगा – 2 कोटी
युवराज सिंग – 1 कोटी
अनमोलप्रीत सिंग – 80 लाख
पंकज जैसवाल – 20 लाख
रसिक दार – 20 लाख
राजस्थान रॉयल्स
जयदेव उनाडकट – 8.40 कोटी
वरुण अॅरॉन – 2.4 कोटी
ओशाने थॉमस 1.10 कोटी
अॅश्टन टर्नर 50 लाख
लायम लिविंगस्टोन 50 लाख
शशांक सिंग 30 लाख
रियान पराग 20 लाख
मनन वोहरा 20 लाख
शुभम रांजने 20 लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
शिवम दुबे 5 कोटी
शिमरॉन हॅटमायर 4.20 कोटी
अक्षदीप नाथ 3.60 कोटी
प्रयास राय बर्मन 1.50 कोटी
हिम्मत सिंह 65 लाख
गुरकीरत सिंह मन 50 लाख
हेनरिच क्लासेन 50 लाख
देवदत्त पडिक्कल 20 लाख
मिलिंद कुमार 20 लाख
सनरायझर्स हैदराबाद
जॉनी बेअरस्टो 2.20 कोटी
रिद्धिमान साहा 1.20 कोटी
मार्टिन गप्टील 1 कोटी