चेन्नई | चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings) आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईने आतापर्यंतच्या 13 मोसमात एकूण 3 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईने या आगामी 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून (IPL 2021 Auction) एकूण 6 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. या 6 खेळाडूंपैकी 5 भारतीय तर 1 परदेशी खेळाडू आहेत. या 6 खेळाडूंवर चेन्नईने एकूण 17 कोटी 35 लाख खर्च केले आहेत. (ipl auction 2021 chennai super kings team see full players list 2021)
चेन्नईने सर्वाधिक 9. कोटी 25 लाख कृष्णप्पा गौतम (krishnappa gowtham) या अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर खर्च केले आहेत. कृष्णप्पा हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. गौतम गत मोसमात पंजाब संघात होता. तसेच सीएसकेने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) 7 कोटी मोजून आपल्याकडे घेतलं आहे. मोईन 13 व्या मोसमात बंगळुरुकडून खेळत होता.
तर उर्वरित 4 खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईजवर खरेदी केलं आहे. यामध्ये टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) समावेश आहे. पुजाराला 50 लाख मोजून ताफ्यात घेतलं आहे. तर हरीशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत या तिकडीला 20 लाख देऊन चेन्नईने आपल्या गोटात घेतलं आहे.
युवा ऑलराउंडर कृष्णप्पा गोतम (krishnappa gowtham) महागडा अनकॅप्ड (एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला) खेळाडू ठरला आहे. कृष्णप्पासाठी चेन्नई सुपर किंग्जने 9 कोटी 25 लाख मोजले आहेत. त्याची बेस प्राईजही 20 लाख इतकी होती. याआधी कृणाल पांड्या हा महागडा अनकॅप्ड प्लेअर ठरला होता. कृणालला मुंबईने 8.8 कोटीमध्ये खरेदी केलं होतं.
चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम निराशाजनक ठरला. सुरेश रैना आणि हरभजन सिंह या महत्वाच्या 2 खेळाडूंनी ऐनवेळेस माघार घेतली. तर कर्णधार महेंद्र सिंह धोनी अपयशी ठरला. धोनीला त्या मोसमात धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. चेन्नने पहिल्या 12 मोसमात दरवेळेस प्लेऑफमध्ये (टॉप 4) प्रवेश मिळवला होता. मात्र गेल्या मोसमात चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. यामुळे चेन्नई या मोसमात जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
गेला 13 व्या मोसम चेन्नईसाठी खराब ठरला. मात्र धोनीने चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. धोनी आयपीएलमध्ये रोहित शर्मानंतरचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. तसेच धोनी आयपीएलमध्ये यशस्वी फलंदाज राहिला आहे.
महेंद्रसिंह धोनी, इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा आणि रॉबिन उथप्पा.
के गौतम- 9.25 कोटी रुपये
मोईन अली- 7 कोटी रुपये
चेतेश्वर पुजारा- 50 लाख रुपये
हरिशंकर रेड्डी- 20 लाख रुपये
के भगत वर्मा- 20 लाख रुपये
सी हरि निशांत- 20 लाख रुपये
संबंधित बातम्या
(ipl auction 2021 chennai super kings team see full players list 2021)