मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या मोसमासाठी सर्व फ्रंचायजीने रिटेन (ipl retention list) आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. 18 फेब्रुवारीला मिनी ऑक्शन होण्याची शक्यता आहे. या 14 व्या मोसमात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरणार, याबाबतची भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) केली आहे. त्याने ट्विटद्वारे ही भविष्यवाणी केली आहे. (ipl auction 2021 Mitchell Starc will be the most expensive player in IPL 2021 predicts aakash chopra)
“स्टार्क महागडा खेळाडू ठरणार”
“ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा या 14 व्या पर्वातील महागडा खेळाडू ठरेल, अशी भविष्यवाणीही त्याने केलीय. मात्र स्टार्कला नक्की किती कोटी मिळतील, तो आकडा आकाशने सांगितला नाही. स्टार्क आतापर्यंत आयपीएलमधील 27 सामन्यात खेळला आहे. यामध्ये त्याने 20.38 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.
Mujeeb to go for 7-8 crore.
Green for 5-6 Crore
Starc to become the most expensive IPL buy ever.
Jamieson to receive solid interest. 5-7 crore
Jason Roy 4-6 crore
Maxwell and NCN will still get decent contracts.
Subject to their availability of course. #EarlyCall #IPL2021— Aakash Chopra (@cricketaakash) January 20, 2021
आकाशने या लिलाव प्रक्रियेत फ्रंचायजींचे कोणत्या खेळाडूंवर विशेष लक्ष असेल, त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या मोसमात महागड्या ठरणाऱ्या खेळाडूंच्या नावासमोर त्यांना किती रक्कम मिळेल, याचाही उल्लेख आकाशने केला आहे.
आकाशने आपल्या ट्विटमध्ये अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमानचा उल्लेख केला आहे. “मुजीबला या मोसमात 7 ते 8 कोटी मिळतील. तसेच कॅमरॉन ग्रीनसाठी 5 ते 6 कोटी मोजून ताफ्यात समाविष्ट केलं जाईल. काईल जेमिन्सनला 5 ते 7 कोटी तर जेसन रॉयला 4 ते 6 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं जाईल”, असा अंदाज आकाशने व्यक्त केला आहे.
दरम्यान राजस्थान रॉयल्सने गुरुवारी ट्रेडिंग नियमानुसार (खेळाडूंची अदलाबदली) रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपरकिंग्स संघाकडे सोपवलं आहे. तसेच या मोसमात ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्ज्सने (CSK) कायम राखलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रैनाच्या फटकेबाजीचा आनंद घेता येणार आहे.
आगामी 14 व्या मोसमासाठीची बोली प्रक्रिया 18 फेब्रुवारीला होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ही लिलाव प्रक्रिया चेन्नईमध्ये पार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
(ipl auction 2021 Mitchell Starc will be the most expensive player in IPL 2021 predicts aakash chopra)