Lasith Malinga |… म्हणून हुकुमी एक्का, यॉर्कर किंग लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्समधून बाहेर

यॉर्कर किंग लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये एकूण 170 विकेट्स घेतल्या आहेत.

Lasith Malinga |... म्हणून हुकुमी एक्का, यॉर्कर किंग लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्समधून बाहेर
यॉर्कर किंग लसिथ मलिंगा
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 12:59 PM

मुंबई : “निवृत्तीबाबत माझ्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. यानंतर या निर्णयावर पोहचलो आहे. फ्रंचायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. कोरोना परिस्थितीमुळे विमानप्रवासात अनेक बदल झाले आहेत. यामुळे अनेक बंधन आलेत. यामुळे फ्रंचायजी क्रिकेट खेळणं माझ्यासाठी अवघड झालं आहे. यामुळे मी या अंतिम निर्णयावर पोहचलो”, असं स्पष्टीकरण लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) दिलं आहे. 20 फेब्रुवारीला आयपीएलच्या आगामी 14 व्या (IPL 2021) मोसमासाठी सर्व संघांनी आपल्या ताफ्यातील रिटेन आणि रिलीज (ipl 2021 retained and released players list) खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली. मुंबई इंडियन्सनेही (Mumbai Indians) लसिथ मलिंगाला रिलीज केलं. यामुळे मुंबईच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. मुंबईने आपल्या हुकमाच्या एक्का का सोडला, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र मलिंगाने आगामी मोसमात खेळणार नसल्याची पूर्व कल्पना आधीच दिली होती. यामुळे मुंबईने त्याला रिलीज केलं. (ipl auction 2021 mumbai indians stated the reason for yorker King lasith malinga retirement)

मलिंगाची निवृत्तीनंतरची पहिली प्रतिक्रिया

“अवघ्या काही दिवसांनी आयपीएलची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. मी या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंटसोबत संवाद साधला. मला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला”, असं मलिंगाने नमूद केलं. तसेच त्याने अंबानी कुटुंबियांचं, मुंबई इंडियन्स संघातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

आयपीएलमधील यशस्वी गोलंदाज

मलिंगा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. मलिगांने एकूण 122 सामन्यात सर्वाधिक 170 विकेट्स घेतल्या आहेत. 13 धावा देऊन 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मलिंगा 13 व्या मोसमात वैयक्तिक कारणामुळे खेळला नव्हता. यामुळे त्याच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला संधी देण्यात आली होती.

मुंबईने रिटेन केलेले खेळाडू

मुंबईने एकूण 17 खेळाडू रिटेन केले आहेत. रिटेन म्हणजेच आपल्या ताफ्यात त्याने कायम ठेवलं आहे. रिटेन ठेवलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी क्वॉक, अनमोलप्रित सिंग, आदित्य तरे, चेरिस लायन, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मोसिन खान, राहुल चहर आणि अनुकूल रॉय यांचा समावेश आहे.

तर एकूण 7 खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे. या 7 पैकी 1 मलिंगाने निवृ्त्ती घेतली आहे. तर उर्वरित 6 जणांना मुंबई टीम मॅनेजमेटं लिलाव प्रक्रियेसाठी मुक्त केलं आहे. यामध्ये मिचेल मॅकलँगन, नॅथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेफ्रन रुदरफोर्ड, प्रिंस बलवंत राय आणि दिग्विजय देशमुखचा समावेश आहे.

फेब्रुवारीत लिलाव प्रक्रिया

14 व्या मोसमासाठी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. कोरोनामुळे यंदा लिलाव प्रक्रियेचा छोटेखानी कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये एकूण 8 संघांनी रिलीज केलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL Retained and Released Players 2021|  लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

(ipl auction 2021 mumbai indians stated the reason for yorker King lasith malinga retirement)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.