Aakash Chopra | ….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.

Aakash Chopra | ....म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण
अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 7:05 PM

चेन्नई |अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबईच्या टीमसोबत राहून बरेच काही शिकू शकतो. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे त्याचे वडिल आहेत. सचिन क्रिकेटचं विद्यापीठ आहे. अर्जुनला आपल्या वडीलांकडून खूप काही शिकता येऊ शकतं. अर्जुन आता सर्वात यशस्वी फ्रँचायजीशी जोडला गेला आहे. मुंबईच्या गोटात अर्जुनला क्रिकेटबाबतीत सर्व छक्के पंजे शिकता येतील. अर्जुनने मुंबईसाठी विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन फक्त त्याच्या आडनावामुळे इथवर पोहचलेला नाही. तो काही न काही करत असतो. मुंबईला अर्जुन हवा होता, त्यामुळे मुंबई फ्रँचायजीने खरेदी केलं आहे”, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू राहिलेला आकाश चोप्रा म्हणाला आहे. (ipl auction 2021 team india former player aakash chopra on arjun tendulkar)

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा या लिलावातील आकर्षणाचा मुद्दा ठरला. अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. दरम्यान यानंतर अर्जुनवर सोशल मीडियावरुन घराणेशाहीच्या मुद्यावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे.

सारा तेंडुलकरकडून कौतुक

अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) अर्जुनचं कौतुक केलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन अर्जुनचं कौतुक केलं आहे. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ताफ्यात सामावून घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन अर्जुनच्या स्वागताची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. तीच पोस्ट साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. सोबत साराने म्हटलं आहे की, ‘ही संधी तुझ्याकडून कोणीच हिरावू शकणार नाही’.

मुंबईने आपल्या गोटात लिलावातून एकूण 7 खेळाडू घेतले. त्यापैकी न्यूझीलंड 2, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 1 आणि भारताचे 3 खेळाडू आहेत. यामध्ये सचिन तेडुंलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. मुंबईने अर्जुनला त्याच्या 20 लाख या बेस प्राईजवर खरेदी केलं.

मुंबईने लिलावातून आपल्या ताफ्यात घेतलेले खेळाडू

अॅडम मिल्न (न्यूझीलंड) 3.20 कोटी रुपये.

न्यूजीलंडचा वेगवान गोलंजदाज अॅडन मिल्न हा 14 व्या मोसमात मुंबईच्या ताफ्यात येणारा पहिला खेळाडू ठरला. मिल्नची बेस प्राइस 50 लाख इतकी होती. पण मुंबईने त्याच्यासाठी 3 कोटी 20 लाख रुपये मोजले.

नॅथन कुल्टर नाइल (ऑस्ट्रेलिया), 5 कोटी रुपये.

पीयूष चावला (भारत), 2.2 कोटी रुपये.

युद्धवीर चरक (भारत), 20 लाख रुपये.

मार्को जॅनसन (दक्षिण आफ्रिका), 20 लाख रुपये.

अर्जुन तेंडुलकर ( भारत), 20 लाख रुपये.

जेमी निशाम (न्यूजीलंड), 50 लाख रुपये.

संबंधित बातम्या :

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, नेटकऱ्यांकडून जोरदार टीका

अर्जुन तेंडुलकरच्या IPL निवडीवर बहीण साराची पहिली प्रतिक्रिया

IPL Mumbai Indians Team 2021 | वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम

(ipl auction 2021 team india former player aakash chopra on arjun tendulkar)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.