IPL Big Breaking : आयपीएलमध्ये कथित मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी, CBIकडून तीन जणांना अटक
आपीएलमध्ये एक रॅकेट भारतीय टी 20मध्ये कथितपणे मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये सहभागी आहे.
मुंबई : आपीएलमध्ये (IPL 2022) कथित मॅच फिक्सिंग (match fixing) आणि सट्टेबाजीचं (Betting) प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात सीबीआयनं (CBI) तीन जणांना अटक केली आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सीबीआय अधिकऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की, एक रॅकेट भारतीय टी 20मध्ये कथितपणे मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये सहभागी आहे. अधिक माहितीनुसार या रॅकेटसंदर्भात पाकिस्तानमधून मिळालेल्या माहितीवरुन सीबीआयने कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने तीन जणांना अटक केली आहे. पुढील तपास चालू आहे.
Match-fixing racket allegedly influenced outcome of IPL cricket matches based on inputs from Pakistan: Officials after CBI books 3 people
हे सुद्धा वाचा— Press Trust of India (@PTI_News) May 14, 2022
CBI has registered two FIRs on allegations of individuals involved in cricket betting are influencing the outcome of Indian Premier League (IPL) matches based on inputs received from Pakistan.
— ANI (@ANI) May 14, 2022
आयपीएलमध्ये सध्या काय चाललयं?
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर होता. तर पंजाब किंग्सचा संघ 5 विजयासह 8 व्या स्थानावर होता. पण कालच्या आरसीबीवरील विजयामुळे पंजाबच्या क्रमावरीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन टीम्सना फटका बसला आहे. पंजाब किंग्सचे अजून दोन सामने बाकी असून त्यांचे 16 पॉइंटस होऊ शकतात. पराभवानंतरही आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर आहे. RCB चा आता फक्त एक सामना उरला आहे.
अंबाती रायुडू 10 मिनिटात निवृत्तीच्या घोषणेवरुन पलटला
चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज अंबाती रायुडूने आयपीएलच्या (IPL) या सीजननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. पण 10 मिनिटात तो आपल्या निर्णयावरुन पलटला. अंबाती रायुडूने टि्वट करुन हे शेवटचं आयपीएल असल्याचं म्हटलं होतं. 13 वर्षांचा हा प्रवास खूप सुंदर होता, असं त्याने लिहिलं होतं. रायुडूच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर वेगाने तो निवृत्त होणार असल्याची बातमी पसरली. त्यानंतर 10 मिनिटात त्याने निवृत्तीचं टि्वट डिलीट केलं. रायुडूने टि्वट डिलीट केल्यानंतर CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी अंबाती रायुडू सन्यास घेत नसल्याची माहिती दिली. “मी आनंदाने घोषणा करतो की, ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा आहे. मागची 13 वर्ष मी दोन चांगल्या संघांसोबत होतो. या शानदार प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा आभारी आहे” असं त्याने टि्वटमध्ये म्हटलं होतं.
टि्वट डिलीट का केलं?
अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा करणं आणि त्यानंतर दहा मिनिटात टि्वट डिलीट करणं यावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे चेन्नई आणि अंबाती रायुडूमध्ये सर्व ठीक आहे ना?. रवींद्र जाडेजाने चेन्नईची साथ सोडली आहे. जाडेजा चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटवर नाराज होता. आता रायुडूने निवृत्तीची घोषणा केली नंतर माघार घेतली. त्यानंतर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. हे सर्व संशयास्पद आहे.