IPL : दिल्ली संघातून आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूवर बलात्काराचा आरोप
संदीप हा आयपीएल स्थान मिळविणारा पहिला नेपाळी खेळाडू आहे. आयपीएलच्या दिल्ली संघाकडून संदीपला 2018 मध्ये पहिल्यांदा संघात स्थान मिळालं होतं.
दिल्ली संघातून आयपीएल (IPL) खेळणाऱ्या एका खेळाडूवर (Cricket Player) बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. हा खेळाडू नेपाळी (Nepali) असून त्याच्या विरोधात काठमांडू येथे अल्पवयीन मुलीकडून बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संपुर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्या मुलीचं मेडिकल केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नेपाळी खेळाडू पुन्हा चर्चेत आला आहे. सद्या तो एका दौऱ्यात त्याच्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात जाणून घ्या खेळाडूची माहिती
नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने यांच्या विरोधात एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्या संदीप नेपाळकडून केनियामध्ये क्रिकेट खेळत आहे.
आयपीएलमधील करिअर
संदीप हा आयपीएलमध्ये स्थान मिळविणारा पहिला नेपाळी खेळाडू आहे. आयपीएलच्या दिल्ली संघाकडून संदीपला 2018 मध्ये पहिल्यांदा संघात स्थान मिळालं होतं. त्यावेळी संदीप याचं वय 17 होतं. 20 लाख रुपयात व्यवस्थापनाकडून त्यांना खरेदी करण्यात आलं होतं.
2016 मध्ये अंडर-19 विश्वचषकात चांगली कामगिरी
संदीप लेग स्पिनर गोलंदाज आहे. त्याने 2016 मध्ये अंडर-19 विश्व चषकात चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या चांगल्या खेळीमुळे नेपाळ आठव्या स्थानी कायम राहिला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर माइकल क्लार्क सुद्धा अधिक प्रभावित झाला होता.