IPL FINAL 2020, MI vs DC : पर्पल कॅपसाठी कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहमध्ये कडवी झुंज

कगिसोने एकूण 16 सामन्यात 29 तर बुमराहने 14 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत.

IPL FINAL 2020, MI vs DC : पर्पल कॅपसाठी कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहमध्ये कडवी झुंज
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 6:18 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020)  मोसमातील अंतिम सामना (IPL 2020 Final) मंगळवारी 10 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. हा अंतिम सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळण्यात येणार आहे. मुंबईने क्वालिफायर 1 मध्ये दिल्लीचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. तर दिल्लीने दुसऱ्या संधीचं सोनं केल. दिल्लीने हैदराबादचा क्वालिफायर 2 सामन्यात धुव्वा उडवत फायनलचं तिकीट मिळवलं. गोलंदाजी ही या दोन्ही संघांची जमेची बाजू आहे. दिल्लीकडे कगिसो रबाडा तर मुंबईकडे जसप्रीत बुमराह असे घातक गोलंदाज आहेत. बुमराह आणि रबाडा यांच्यात अंतिम सामन्यात पर्पल कॅपसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. IPL FINAL 2020 Mumbai Indians vs Delhi Capitals Kagiso Rabada and Jaspreet Bumrah clash for Purple Cap

पर्पल कॅपसाठी काटे की टक्कर

ताज्या आकडेवारीनुसार कगिसो रबाडाकडे पर्पल कॅप आहे. क्वालिफायर 2 सामन्यात कगिसो रबाडाने एकूण 4 विकेट्स घेतल्या. यासह त्याने बुमराहकडे असलेली पर्पल कॅप मिळवली. रबाडाने हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात रबाडाने 19 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह रबाडाने सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराहला पछाडले. ताज्या आकडेवारीनुसार कगिसोने या मोसमात एकूण 16 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत. 4/24 ही कगिसोची या मोसमातील सर्वोच्च कामगिरी आहे.

तर दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराहने एकूण 14 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. 4/14 ही बुमराहची सर्वोच्च कामगिरी आहे. कगिसोच्या तुलनेत बुमराहने 2 मॅचेस कमी खेळल्या आहेत. तरीही बुमराह आणि कगिसोच्या विकेट्सचे अंतर केवळ 2 ने जास्त आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात पर्पल कॅपसाठी या दोन्ही गोलंदाजांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

दिल्लीची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर मुंबईची ही सहावी वेळ आहे. मुंबई आयपीएलमधील यशस्वी टीम आहे. मुंबईने सर्वाधिक 4 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017 आणि 2019 अशा एक वर्षाच्या अंतराने विजेतेपदावर नाव कोरण्यास यश मिळवले आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्ली पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचली आहे. मुंबईकडे अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे. तसेच मुंबईने दिल्लीचा साखळी फेरीतील 2 सामन्यात तसेच क्वालिफायर 1 मध्ये अशा पद्धतीने सलग 3 वेळा पराभूत केलं आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्ध मुंबईच पारडं जड आहे. मात्र तरीही अंतिम सामन्यात कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : हैदराबादच्या ताफ्यातील नव्या यॉर्कर किंगचा उदय, थंगारासू नटराजनने ट्रेन्ट बोल्ट, जेसन होल्डरला पछाडलं

Photo | MI Vs DC आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड करणाऱ्या 5 गोष्टी

IPL FINAL 2020 Mumbai Indians vs Delhi Capitals Kagiso Rabada and Jaspreet Bumrah clash for Purple Cap

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.