IPL खेळाडूने बलात्काराचा आरोप फेटाळला, क्रिकेट असोसिएशनने घेतला मोठा निर्णय
संदीप लैमिछाने असं नेपाळी खेळाडूचं नाव आहे. सध्या तो कॅरिबियन दौऱ्यावर आहे.
आयपीएल (IPL) खेळणाऱ्या एका खेळाडूवरती बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पण त्याने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या तो कॅरिबियन (Caribbean) दौऱ्यावर आहे. तो तिथून दौरा अर्धवट सोडून परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे. ज्या मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे, ती मुलगी अल्पवयीन आहे. आयपीएलमध्ये दिल्लीच्या (Delhi) संघातून तो खेळाडू खेळला आहे.
हे सुद्धा वाचा— Sandeep Lamichhane (@Sandeep25) September 9, 2022
ज्या मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे, ती मुलगी 17 वर्षाची आहे. त्याचबरोबर ही मुलगी नेपाळची आहे आणि खेळाडू सुध्दा नेपाळचा आहे, मुलीची वैद्यकीच चाचणी झाल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे मुलीवरती बलात्कार झाल्याचं वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झालं आहे.
संदीप लैमिछाने असं नेपाळी खेळाडूचं नाव आहे. सध्या तो कॅरिबियन दौऱ्यावर आहे. तो दौरा अर्धवट सोडून नेपाळला परतणार असल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे. त्याचबरोबर माझा नेपाळच्या कायदा आणि व्यवस्थेवरती विश्वास आहे. पीडीत मुलीची कसून चौकशी व्हावी अशी इच्छा खेळाडूनी व्यक्त केली.
नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनने संदीप लैमिछाने यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्याला निलंबित केले आहे. सचिव प्रशांत विक्रम मल्ला यांनी घेतलेल्या बैठकीत संदीप लैमिछाने यांच्या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.