RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड

IPL Rajasthan Royals Released Players 2021 : आयपीएल 2020 मध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आता कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड
संजू सॅमसन
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 7:41 PM

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील भारतीय क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयपीएलसाठी लिलावाची प्रक्रिया पार पडते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे लिलावाची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबली आहे. दरम्यान, इंडियन प्रिमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये (प्राथमिक लिलाव) राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला करारमुक्त करण्याचा (रिलिज करण्याचा) निर्णय घेतला आहे. (IPL Retained and Released Players 2021, Rajasthan Royals release Steve Smith, Sanju Samson as captain)

आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींना ते कोणत्या खेळाडूंना त्यांच्या संघात कायम ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंना करारमुक्त करणार, याबाबतची यादी बीसीसीआयला पाठवावी लागते. राजस्थान रॉयल्सने ही यादी बीसीसीआयला पाठवली आहे. त्यामध्ये त्यांनी कर्णधार स्टिव्ह स्मिथला संघातून रिलीज केले असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती जाहीर केली आहे. दरम्यान स्मिथच्या जागी धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी वर्णी लागली आहे.

स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानची सुमार कामगिरी

स्मिथने आयपीएलच्या 2014, 2015 आणि 2019, 2020 या चार मोसमांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. स्मिथच्या नेतृत्वातील राजस्थानच्या संघाने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सुमार कामगिरी केली होती. हा संघ गुणतालिकेत तळाला राहिला होता. तसेच स्मिथनेही फलंदाजी फार चमकदार कामगिरी केली नव्हती. तर दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याचं फळ सॅमसनला मिळालं आहे.

फलंदाजीतही स्मिथ फ्लॉप

आयपीएलच्या 14 व्या मोसमात स्मिथने फलंदाजीत प्रभावहीन कामगिरी केली होती. त्याने 14 सामन्यांमध्ये 131 च्या स्ट्राईक रेटने केवळ 311 धावा जमवल्या होत्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. संघाच्या वाईट कामगिरीमुळे स्टिव्ह स्मिथवर खूप टीका करण्यात आली, तसेच राजस्थानने कर्णधार बदलायला हवा, असे सल्ले अनेक क्रिकेट समीक्षक देत होते. त्यामुळेच राजस्थानच्या संघमालकांनी स्मिथला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बोलले जात आहे.

हेही वाचा

IPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

(IPL Retained and Released Players 2021, Rajasthan Royals release Steve Smith, Sanju Samson as captain)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.