आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2021) चौदाव्या पर्वातील उरलेल्या मॅचेस 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. (IPL Second phase match Start 20 Sep but BCCI Challenge Foreign player Availibility)

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!
आयपीएलच्या उरलेले सामने 19 किंवा 20 सप्टेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे.
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:35 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2021) चौदाव्या पर्वातील उरलेल्या मॅचेस 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील उर्वरित 31 मॅचेस संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईत खेळवल्या जाणार आहेत तसंच जगातील सगळ्यात लोकप्रिय टी-ट्वेंटी स्पर्धा अर्थात आयपीएलची फायनल मॅच 10 ऑक्‍टोबरला खेळविण्याचं नियोजन आहे. बीसीसीआय लवकरच ही घोषणा करण्याचा तयारीत आहे परंतु. यापुढे बीसीसीआयसमोर काही एक मोठी समस्या उभी राहिली आहे. (IPL Second phase match Start 20 Sep but BCCI Challenge Foreign player Availibility)

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयपुढे विदेशी खेळाडूंची आयपीएलमधील नगण्य उपस्थिती ही प्रमुख समस्या असणार आहे. कारण ज्यावेळी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन होतंय त्यावेळी बऱ्याचश्या देशांचे खेळाडू आपापल्या संघाकडून किंवा स्थानिक स्पर्धेत खेळण्यात व्यस्त असतील मग ते इंग्लंडचे खेळाडू असोत, न्यूझीलंडचे असोत वा अफगाणिस्तानचे… इतकंच नाही तर मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करणारे वेस्टइंडीजचे प्लेअरसुद्धा…

कारण कॅरिबियन प्रिमियर लीग देखील सप्टेंबर महिन्यात सुरु होत आहे. या चार देशांचे खेळाडू आपापल्या संघाकडून खेळणार असल्याने विदेशी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. आयपीएलच्या 14 पर्वातील सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये सामील होतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जातीय.

आयपीएलच्या 14 व्या पर्वात पर्वात न्यूझीलंडचे खेळाडू खेळतील की नाही याबाबत देखील साशंकता आहे. कारण ज्यावेळेत आयपीएल होते आहे त्याच दरम्यान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे विल्यमसन, ट्रेंट बोल्ट अशा दिग्गज खेळाडूंना आयपीएल खेळणं मुश्कील होऊन बसलं आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीग… BCCI समोरचं सगळ्यात मोठं आव्हान

बीसीसीआय समोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते कॅरेबियन प्रीमियर लीगचं… कारण 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या दरम्यान कॅरिबियन प्रीमियर लीग पार पडत आहे. वेस्टइंडीजचे खेळाडूंनी जरी ही स्पर्धा संपवून लगोलग आयपीएल जॉईन करायचं ठरवलं तरी त्यांना काही दिवस दुबईत क्वारंन्टाईन राहावं लागणार आहे. अशा वेळी सुरुवातीचे दहा दिवस वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएल जॉईन करू शकत नाही अशी शक्यता आहे.

तसंच इंग्लंडचा संघ देखील बांगलादेश दौऱ्यावर येतोय. बांगलादेशविरुद्ध इंग्लंडला मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत. त्यानंतर इंग्लंडला पाकिस्तान विरुद्ध देखील खेळायचं आहे. अशा वेळी मोईन अली, बेन स्टोक, जॉस बटलर, ओयन मॉर्गन यांसारख्या खेळाडूंना आयपीएलला मुकावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (IPL Second phase match Start 20 Sep but BCCI Challenge Foreign player Availibility)

हे ही वाचा :

‘मी विचारही केला नव्हता, मला हे दिवस बघायला मिळतील’, स्मृती मंधानाचा मोठा खुलासा

4 डावांत 105 रन्स, 16 बॅट्समन शून्यावर आऊट, एका दिवसांत जिंकली ऑस्ट्रेलियाची टीम, पाहा सनसनाटी मॅच…..

जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.